राष्ट्रवादी नेते नागेश फाटे यांचा ‘वाढदिवस’ विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या कडून सन्मान,जयंत पाटलांकडून कौतुक,कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
राष्ट्रवादी नेते नागेश फाटे यांचा ‘वाढदिवस’ विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा
अनिल सावंत यांच्या कडून सन्मान,जयंत पाटलांकडून कौतुक,कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
पंढरपूर - राजकीय,सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. महाराष्टात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांचा राजकीय वारसा नागेश दादा फाटे यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे.

त्यांचेच औचित्य साधून आज फाटे फॅक्टर्स शोरूम सिंहगड कॉलेज जवळ कोर्टी रोड पंढरपूर येथे ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्था पंढरपूर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात.त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन.नागेश फाटे यांनी केले होते त्यांच्या आव्हानाला युवक वर्गाने मोठा प्रतिसाद दिला.

तसेच आज सकाळपासूनच फाटे शोरूम येथे नागेश दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

तसेच भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांनी देखील नागेश फाटे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात जयंत पाटील यांचे विश्वास म्हणून ओळख असणाऱ्या नागेश फाटे यांना खुद्द निष्ठावंत कार्यकर्त्याला कॉल वरून शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते भास्कर बापू बागल, राष्ट्रवादी जिल्हा संघटक सुधीर आबा भोसले,भगवान महाराज बागल, बाजीराव बागल, गुलाब भाई मुलानी, दत्ता बागल, एकनाथ नाना फाटे वडील ब्लड बँकेचे चेअरमन डॉक्टर प्रसाद खाडिलकर, सरकार पाटील, संजय बागल,शांतीनाथ बागल, डॉक्टर रमेश फाटे,संजय बागल सर, अनिल बागल सर, स्वप्निल फाटे, हनुमंत फाटे सर,