आमदार जयंत आसगावकर यांच्या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील शिक्षक, संस्थाचालकांशी साधला संवाद

आमदार जयंत आसगावकर यांच्या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार जयंत आसगावकर यांच्या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील शिक्षक, संस्थाचालकांशी साधला संवाद

पंढरपूर - पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांनी मतदार संघातील दौऱ्यात शिक्षक मुख्याध्यापक व संस्थाचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या दौऱ्यात त्यांनी विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, आगामी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला.आसगावकर यांनी मतदार संघातील विविध भागांतील शाळा,महाविद्यालय,शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.

या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या सेवाविषयक आणि प्रशासकीय अडचणी जाणून घेतल्या. यातील अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले, तर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संचालक स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि ग्रामोन्नती मंडळ, नारायणगावचे अध्यक्ष डॉ. अजितभाऊ खैरे यांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला.

सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा - 

यावेळी आमदार आसगावकर यांनी आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा आढावा शिक्षकांसमोर मांडला. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात शिक्षकांच्या वेतन अनुदानातील तीन टप्यांची वाढ झाली असून, चौथ्या टप्प्याची घोषणाही झाली आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील पहिला मोर्चा कोल्हापुरातून काढण्यात आला. राज्यातील 26 हजार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच तमिळनाडू राज्याच्या धतींवर राज्यातील पात्र शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट मिळावी, यासाठी

माझा लढा सुरू आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामांमध्ये गुंतविल्यामुळे अध्याप्नावर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगत त्यांनी अशा कामांना विरोध दर्शविला. "गेल्या सहा वर्षांत 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' या भूमिकेतून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणे हेच माझे ध्येय असून, यापुढेही त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे लढत राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.