गावा गावात आई वडिलांचा आनंदोत्सव साजरा होणे आणि सेवा करणे ही काळाची गरज - संभाजीराजे शिंदे

आई वडिलांची सेवा हेच खरे दैवत आहेत त्यांची सेवा करा - ह.भ.प.एकनाथ महाराज नामदास

गावा गावात आई वडिलांचा आनंदोत्सव साजरा होणे आणि सेवा करणे ही काळाची गरज - संभाजीराजे शिंदे

आई वडिलांची सेवा हेच खरे दैवत आहेत त्यांची सेवा करा - ह.भ.प.एकनाथ महाराज नामदास

गावा गावात आई वडिलांचा आनंदोत्सव साजरा होणे आणि सेवा करणे ही काळाची गरज - संभाजीराजे शिंदे

पंढरपूर  - भाळवणी येथे कलढोणे परिवाराच्या वतीने  पाच भावंडांचा एकत्रित अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ह.भ.प.एकनाथ महाराज नामदास बोलत होते.सुरुवातीला एकनाथ महाराज नामदास,सुदाम कलढोणे, उमराव‌ कलढोणे, शंकर कलढोणे, कल्याण कलढोणे, शत्रुघ्न कलढोणे, बाळासाहेब काळे, संभाजीराजे शिंदे,यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे का गरजेचं आहे.उद्देश सांगितला.

त्यानंतर या कलढोणे परिवारातील सहस्त्र दर्शन सोहळा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सह्रदय ८१ दिव्यांनी औक्षण आणि मुलांच्या आणि लेकींंच्या शुभहस्ते आईवडिलांची पाद्यपूजा करत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज एकनाथ महाराज नामदास, संभाजीराजे शिंदे, बाळासाहेब काळे सर, वासुदेव महाराज फलके, ज्ञानदेव रसाळ यांचे शुभहस्ते सह्रदय सत्कार करण्यात आला.त्यानंतर प्रत्येकांच्या आयुष्यात आई वडील आणि आप्तेष्ट किती महत्त्व पूर्ण आहेत.याचा सुंदर मिलाप या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.

त्यामध्ये राधा इदाते,राजू करपे, डॉ बाळकृष्ण नष्टे, दीपक कलढोणे,सांगली जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, अंजली रसाळ,राहुल कलढोणे, यांच्या मनोगताने भावस्पर्शी कार्यक्रम झाला.प्रत्येकांच्या आयुष्यात संस्कार, शिस्त,किती महत्त्वाची आहे.आणि ते आपल्या मुलांवर रुजवण्यासाठी आई वडिलांची भुमिका अतिशय महत्त्वाची आहे ती या पाच भावांच्या माध्यमातून सर्वांवर घडली.शिवाय पाच भावंडांचा एकत्रित अभिष्टचिंतन सोहळा हाच एक समाजाला प्रेरणा देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव असून असे उत्सव समाजात सातत्याने होणे आवश्यक आहे असे सांगत कल्याण कलढोणे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कष्टातून कसं पुढं गेलो भावस्पर्शी आठवणी सांगितल्या.एकनाथ महाराज नामदास यांनी कुटुंबाचा आनंदसोहळा कुळी कन्या पूत्र होती जे सात्विक अशा पध्दतीने होत असताना प्रत्येकांच्या जीवनात सुख दुःख येतच असते.त्यातून कलढोणे परिवाराचे रामनामाचे संस्कार दिसत असल्याचे जाणवले.यावेळी भाळवणीकर ग्रामस्थ, आप्तेष्ट,मित्र मंडळी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.आभार गोविंद कलढोणे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम कलढोणे, प्रथमेश कलढोणे,नवल कलढोणे,गोविंद कलढोणे, दत्तप्रसाद दुधाणे, कौस्तुभ कलढोणे,प्रणव‌ कलढोणे,संतोष कलढोणे,तसेच सर्व लेकींनी सुनांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या सुंदर कार्यक्रमाला आल्याचा भाव‌ प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.