पंढरपूर सिंहगड मध्ये "मराठी राज्यभाषा गौरव दिन" साजरा

पंढरपूर सिंहगड मध्ये "मराठी राज्यभाषा गौरव दिन" साजरा

पंढरपूर सिंहगड मध्ये "मराठी राज्यभाषा गौरव दिन" साजरा

पंढरपूर - एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने "मराठी राज्यभाषा गौरव दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

प्रारंभ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले, मराठी भाषेचे संवर्धन होणे आज काळाची गरज आहे. इंग्रजी भाषा ही काळाची गरज असली तरी आपलं सद्या जगातील जगणं हे मराठी आहे. १९१९ मध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या निधनानंतर सरकारने "मराठी राज्यभाषा गौरव दिन" साजरा करण्यास सुरवात करण्यात आली. ऐतिहासिक काळात मराठी भाषा परकीय आक्रमण झाले माञ दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजानी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न केले.

साहित्यिक साहित्यातून ज्ञान देतो.  साहित्याची भक्ती करा, निश्चितच मराठी भाषेचे संवर्धन होईल. साहित्य लिहिताना सातत्य ठेवा. मराठी भाषेसाठी चौफेर लेखन करण्याचे आवाहन त्यांनी साहित्यिकांना केले. मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्था प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी आपली मराठी भाषा आहे. या मातृभाषेचे संरक्षण आपण सर्वांनीच केले पाहिजे असे मत प्राचार्य डॉ. कैलाश कराडे यांनी बोलताना व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.