पालकमंत्री यांच्या हस्ते समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान ; पंढरपुरला प्रथमच मिळाला मानाचा बहुमान
पालकमंत्री यांच्या हस्ते समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान ; पंढरपुरला प्रथमच मिळाला मानाचा बहुमान
पंढरपूर - भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील युवकांचा व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जाणता मा.समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी दहा हजार रु.चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.हा पुरस्कार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन.. जिल्हा परिषदेचे सीईओ कशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य,उपमहापौर जानेश्वरी देवकर,जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश मोहारे. अपर जिल्हाधिकारी गणेश निन्हाळी, तालुक क्रिडाधिकारी राहुल गायकवाड आदी मान्यवर उपस्थितीत होते.
पंढरपूर शहर व तालुक्यातून महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळविणारे मुजम्मील कमलीवाले हे पहिले युवा समाजसेवक ठरले आहेत, अशी माहिती असून त्यांच्या या सन्मानामुळे पंढरपूरच्या सामाजिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुजम्मील कमलीवाले हे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून गरजू व वंचित नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. भुकेल्या व गरजू व्यक्तींना अन्नदान, बेघर व निराधारांना मदत, गरजूंसाठी कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, आरोग्यविषयक मदत, रक्तदानासाठी जनजागृती, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची शासनस्तरावर झालेली दखल असून, या सन्मानामुळे पंढरपूरच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवा पिढीला नवी प्रेरणा मिळणार आहे.पंढरपूरच्या भूमीतून सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याने समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.