देशाच्या विकासात प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे - मंत्री जयकुमार गोरे
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसला सदिच्छा भेट; चिणके ग्रामपंचायत वेबसाईटचे उद्घाटन
देशाच्या विकासात प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे - मंत्री जयकुमार गोरे
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसला सदिच्छा भेट; चिणके ग्रामपंचायत वेबसाईटचे उद्घाटन
सांगोला - "विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शहरांबरोबरच ग्रामीण भागाचाही सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास झाल्यास देश अधिक सक्षम आणि प्रगत बनेल. देशाच्या विकासात प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, सांगोला येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाऊसाहेब रूपनर यांनी फॅबटेकच्या शैक्षणिक, तांत्रिक आणि कौशल्यविकास क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण तसेच नामांकित कंपन्यांमधील कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी तसेच संस्थेच्या भविष्यातील विकास आराखड्याची माहितीही त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चिणके ग्रामपंचायतच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल ग्रामविकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

या प्रसंगी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, उद्योजक राजाभाऊ रूपनर, संजय रूपनर, संस्थेचे सचिव डॉ. अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, सभापती पुनमताई इंगोले, इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य तानाजी बुरूंगले, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सत्यशील कोळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सोमनाथ ठिंगळे, प्रा. धनंजय शिवपुजे, प्रा. प्रियंका पावसकर, सत्यवान कुंभार, रमेश खांडेकर, दत्तात्रय शिंदे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोट -
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे अभियांञिकी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करत असुन कॅम्पस पहिल्यावर ग्रामीण भागत असल्यासारखे वाटत नाही अनेकांच्या हाताला काम देण्याचे काम रूपनर बंधुनी केल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.