पंढरीत घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धा; आकर्षक पारितोषिक

समाजसेवक नवनाथ रानगट यांचा स्तुत्य उपक्रम 

पंढरीत घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धा; आकर्षक पारितोषिक

पंढरीत घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धा; आकर्षक पारितोषिक

समाजसेवक नवनाथ रानगट यांचा स्तुत्य उपक्रम 

पंढरपूर - पंढरपूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच उपनगरातील प्रभाग क्रमांक 14 येथील माजी नगरसेवक सौ.अर्चना नवनाथ रानगट, समाजसेवक नवनाथ रखमाजी रानगट यांनी प्रभागातील जनतेसाठी घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धाचे आयोजन केले आहे.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक आणि भेटवस्तू देण्यात येणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असल्याची माहिती समाजसेवक नवनाथ रानगट यांनी दिली.

यामध्ये गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या स्पर्धकाला ५१०० रुपये पर्यंतची पैठणी, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकाला ३१०० पर्यंतची पैठणी, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला १५०० पर्यंतची पैठणी देण्यात येणार आहे. तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या स्पर्धकाला मिक्सर, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला कुकर तर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला डिनर सेट भेट देण्यात येणार आहे. याचबरोबर स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

फार्म स्वीकारण्याची अंतिम मुदत शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत ठेवण्यात आली आहे.तरी प्रभागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेवक नवनाथ रानगट यांनी केले आहे.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी फॉर्म मिळवण्यासाठी खालील ठिकाण व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधाव
गोडसे किराणा (मर्दा शेठ) सावरकर नगर,(मो. 9673964343),गुरुप्रसाद किराणा वांगीकर नगर,(मो. 9970627562),मस्के मेडिकल, प्रशांतराव परिचारक नगर,(मो. 8956307071),डी. राम ज्वेलर्स स्वामी समर्थ मठ,(मो. 9822218818),आरकीले काका दुकान एकता नगर, तळेवरील परिसर,(मो. 982206476),लक्ष्मी किराणा (संदीप साळुंखे) वसंत नगर,(मो. 8788890206),वेदांत किराणा हरिहर रेसिडेन्सी रोड (मो. 9922790091),चक्रपानी जोशी व्यंकटेश नगर,(मो. 8793399727),गजानन जनरल स्टोअर्स नागालॅन्ड चौक,(मो. 8329394303)
,महावीर शॉपी मनिषा नगर,(मो. 9370111145),नवनाथ गेंड गेंड वस्ती (मो.9860079091),सुजल ट्रेडिंग कंपनी शेहनाई गार्डन समोर (मो. 9766472503), संपर्क क्रमांक  9284063511,

ही स्पर्धा फक्त प्रभाग क्र. १४ साठी राहील.याची नोंद घ्यावी.