कृषी पंढरी" ​कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव -२०२६ चे आयोजन ; मा.आ.प्रशांत परिचारक यांनी पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी करत कृषी महोत्सवाच्या प्रशासकीय तयारीचा घेतला आढावा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

कृषी पंढरी" ​कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव -२०२६ चे आयोजन ; मा.आ.प्रशांत परिचारक यांनी पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी करत कृषी महोत्सवाच्या प्रशासकीय तयारीचा घेतला आढावा

कृषी पंढरी" ​कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव -२०२६ चे आयोजन.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

मा.आ.प्रशांत परिचारक यांनी पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी करत कृषी महोत्सवाच्या प्रशासकीय तयारीचा घेतला आढावा

पंढरपूर - श्री क्षेत्र पंढरपूर येथे  आषाढी एकादशी यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित 'कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सवाचा' भव्य उद्घाटन सोहळा दि. २४ जुलै रोजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पांडुरंग परिवार, कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर, यांच्यावतीने मा आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कृषी प्रदर्शनाचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. दूरदृष्टी व शेतकरी हिताचे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवणारे सोलापूर जिल्ह्याचे मा आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी "कृषी पंढरी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी  महामहोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

दरम्यान आषाढी एकादशी यात्रेनिमित्त आलेल्या लाखो भाविकांना कृषी क्षेत्राशी निगडित विविध घटकांची, तसेच विविध उपकरणांची शेती उपयोगी सेंद्रिय खतांची, व शेतमालाची उत्पादने कशा पद्धतीने वाढवावी, आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन या कृषी पंढरी प्रदर्शनात लाभते. गेल्या अनेक वर्षापासून आषाढी यात्रा कालावधी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये लाखोच्या संख्येने  शेतकरी भाविक सहभागी होऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबत व शेतीतील पिकांचे उत्पादन क्षमता वाढवणे, आधुनिक पद्धतीने शेती, नवीन उपकरणे, सुधारित बी  बियाणे, सुधारित ऊस बेणे , सुधारित ऊस लागवड, निरनिराळी जातीचे कृषी  विषयक उत्पादने, तसेच फळबाग लागवड, इत्यादी प्रकारची कृषी विषयक माहिती शेतकरी वारकरी भाविकांना मिळते.  आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आणि भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

​याच पार्श्वभूमीवर, आगामी आषाढी एकादशी 2026 च्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सवाचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. या कृषी महाउत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

दरम्यान आज सोलापूर जिल्ह्याचे विधानपरिषदेचे मा. आमदार प्रशांत परिचारक यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर  येथे जाऊन भव्य कृषी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी केली व या कृषी महोत्सवाच्या प्रशासकीय तयारीचा सविस्तर आढावा प्रशांत परिचारक यांनी घेतला. वारकरी बांधव आणि शेतकरी बांधव यांच्यासाठी हे कृषी प्रदर्शन कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची पर्वणी ठरेल, असा विश्वास देखील यावेळी मा. आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला आहे

​या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ तसेच पांडुरंग परिवारातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.