प्लास्टिक कचरा प्रक्रियेसाठी गोपाळपूर मध्ये अत्याधुनिक मशीन
सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते शुभारंभ
प्लास्टिक कचरा प्रक्रियेसाठी गोपाळपूर मध्ये अत्याधुनिक मशीन
सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते शुभारंभ

पंढरपूर - आषाढी यात्रे निमित्त होणारा प्लास्टिक कचराचे प्रक्रिया करणे साठी गोपाळपूर ग्रामपंचातीने नाविन्यपुर्ण उपक्रम राबवित प्लास्टिक बाटल्यांचे लहान तुकडे करणारी मशीन बसविली आहे.या मशीनचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करणेत आला. या मशीन मध्ये प्लास्टिक बाटल्या टाकून चाचणी घेणेत आली.

याप्रसंगी गट विकास अधिकारी सुशील संसारे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच पुष्पा राजेंद्र बनसोडे, उपसरपंच लक्ष्मण लेंगरे, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती पाटील
सदस्य विलास मस्के,उज्वला बनसोडे, मनिषा आसबे,विक्रम आसबे,सविता आसबे, कमलाक्षी गुरव,उदय पवार,गोदाबाई सुर्यवंशी,राहुल माने, सीमा म्हेत्रे,पांडुरंग देवमारे,इकबाल कांबळे, विठ्ठल पडवळे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी इ उपस्थित होते.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामपंचायती मधील केलेल्या वैद्यकीय सुविधा केंद्र, हिरकणी कक्षाची पाहणी केली.

दररोज पाच हजार बाटल्या क्रश करणेची क्षमता ..!
गोपाळपूर ग्रामपंचायतीने दररोज पाच हजार बाटल्या क्रश करणेची क्षमतेची मशीन बसविली आहे. १० हाॅर्स पाॅवर क्षमतेची मोटार आहे. या साठी सोलार वर विद्युत सेवा पुरविणेत आली आहे. गोपाळपूर तीर्थ क्षेत्र करणेत आले आहें. जिल्ह्यात हा पहिला उपक्रम असल्याचे पंचायत अधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले.

या प्लास्टिक कचरा सिमेंट कंपनीला विकणेत येणार आहे. यात्रेनिमित्त येणारे भाविक मोकळ्या प्लास्टिक बाटल्या टाकतात. प्लास्टिक कचरा संकलना साठी ग्रामपंचायतीचे हद्दीत प्लास्टिक संकलन केंद्र उभारणेत आले आहे.