बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधवी कुसुमडे यांची बिनविरोध निवड
बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधवी कुसुमडे यांची बिनविरोध निवड
पंढरपूर - बोहाळी (ता.पंढरपूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आ. समाधान आवताडे गटाच्या माधवी कल्याण कुसुमडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच शिवाजी पवार व ग्रामपंचायत अधिकारी म्हमाणे यांच्या उपस्थित मंगळवार दि. 26 ऑगष्ट रोजी सभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी माधवी कल्याण कुसुमडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाीहर करण्यांत आले.
माधवी कुसुमडे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यांत आला. गुलालाची उधळण करत ग्राममस्थांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच शिवाजी पवार, माजी उपसरपंच जगन्नाथ जाधव, बाळासाहेब जाधव, राणी जाधव, वैशाली शिंदे ग्रा.पं. सदस्य राजेश कुसुमडे, आकाश चंदनशिवे, मोनाली घोडके, शुभांगी कुंभार तसेच नानासाहेब जाधव, विठ्ठल पाटील, मधुकर कुसूमडे, धर्मराज कुसूमडे, बंडु जाधव, जालिंदर कुसूमडे, पै.सतीश कुसुमडे, विक्रम चंदनशिवे, नागेश घोडके, सर्जेराव जाधव, अण्णा जाधव, बाळासाहेब जाधव, सुधाकर पाटील, पंजाब पवार, सोमनाथ कुसूमडे, आनंता खुळे, दादा कुसूमडे, चंद्रकांत कुसूमडे, ग्रामपंचायत अधिकारी म्हमाणे आदी उपस्थित होते.
चौकट -
परिचारक गटाचे भास्करदादा कसगावडे यांच्या सर्व ग्रामपंचायत पंचायत सदस्य यांनी सहकार्य केल्याने उपसरपंच पदी माधवी कुसूमडे यांची निवड झाली