लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा.
पंढरपूर पंचायत समितीकडे ग्रामपंचायतीच्या वतीने मागणीचे दिले निवेदन
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा.
पंढरपूर पंचायत समितीकडे मागणीचे दिले निवेदन
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीची मागणी संमतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार : गटविकास अधिकारी प्रशांत काळे
पंढरपूर - पंढरपूर शहरालगत असलेली लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत करण्याचे मागणीचे निवेदन ग्रामपंचायतच्या वतीने पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच सौ.विजयमाला वाळके, उपसरपंच संजय साठे,ग्रा.पं. सदस्य नंदकुमार वाघमारे, औदुंबर ढोणे, महादेव पवार, सागर सोनवणे, आशाबाई देवकाते, रेश्मा साठे, रोहिणी साठे, रूपाली कारंडे, ज्योतीताई पांढरे, सुनिता जाधव, सविता पवार, उषा घाडगे,मा.सरपंच बापूसाहेब कदम, मा. उपसरपंच सचिन वाळके, माऊली देशमुख, सागर कारंडे, बापूसाहेब देवकाते, औदुंबर पोतदार, विठ्ठल ढोणे, महादेव काशीद, नाना मोरे, सुरेश टिकोरे, सुरेश भोसले, माणिक सय्यद आदी उपस्थित होते.

पंढरपूर शहरा नजीक असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची संख्या २०११ साली १० हजार होती. मात्र सध्या स्थितीला शहरालगत असलेल्या या ग्रामपंचायतीचा झपाट्याने विस्तार होत असल्याने ही संख्या २० ते २५ हजारापर्यंत गेल्याने येथील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
याबाबत लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे नगरपंचायत करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीच्या वतीने एकमताने संमत करण्यात आला आहे.
सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना याबाबतचे पत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी काळे म्हणाले की ग्रामपंचायत कडून आलेला ठराव व पंचायत समिती कडून आलेला ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे संमतीसाठी पाठवण्यात येणार आसल्याचे आश्वासन उपस्थित त्यांना दिले.