भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले नितीन काळे यांचे अभिनंदन!
पंढरपूरकरांसाठी अभिमानाची बाब
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले नितीन काळे यांचे अभिनंदन!
पंढरपूरकरांसाठी अभिमानाची बाब
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील धाडशी समाजसेवक नितीन काळे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अभिनंदन करणारे लेखी पत्र दिले असून हा आपल्या पंढरपूर तालुक्यातील जनतेसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे..

नितीन काळे हे पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण चेहरा आहे. त्यांनी आजवर अनेक सामाजिक प्रश्नासाठी आंदोलने केली आहेत. त्यामध्ये त्यांना बर्यापैकी यश मिळाले आहे.
आशा या उमद्या तरुण आणि समाजसेवक असलेल्या नितीन काळे यांना भाजपने गळाला लाऊन त्यांच्यावर राज्यस्तरीय पद दिले आहे. यामुळे भाजप वाढविण्यासाठी पक्षाला मोठा फायदा होणार आहे.

नितीन काळे हे धनगर समाजातील व्यक्तिमत्व असून समाजाच्या विविध प्रश्नासाठी मोठे योगदान आहे.पंढरपूर तालुक्यातील धनगर समाज मोठा आहे. हे ओळखूनच भाजपने पंढरपूर तालुक्यातील या कार्यकर्त्याला मोठे पद दिले आहे.नितीन काळे आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे व्यक्तिगत संबंध पूर्वीपासूनच आहेत. त्यामुळे काळे यांची निवड होण्यापूर्वी आपल्या हक्काचा कार्यकर्ता म्हणून पद मि ळऊन दिले आहे. अशातच त्यांनी लेखी पत्र देऊन नितीन काळे यांचे अभिनंदन केल्याने नितीन काळे यांचे राजकीय वजन वाढले आहे. राज्य सरकार विविध महामंडळ नियुक्ती करेल यामध्ये नितीन काळे यांच्या नावाला सध्या तरी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळत असल्याचे दिसत आहे. यामुळे भाजपने दिलेले हे राज्यस्तरीय पद नितीन काळे सार्थकी लागतील हे मात्र नक्की.