अर्जुनराव चव्हाण यांचे समाजासाठी असलेले कार्य प्रेरणादायी - रामभाऊ वाकडे
मंगळवेढा येथे अ.भा.मराठा महासंघाचे शाखांचे उद्घाटन व नागरी सत्कार
अर्जुनराव चव्हाण यांचे समाजासाठी असलेले कार्य प्रेरणादायी - रामभाऊ वाकडे
मंगळवेढा येथे अ.भा.मराठा महासंघाचे शाखांचे उद्घाटन व नागरी सत्कार
पंढरपूर- मंगळवेढा - मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी झटत असलेले अर्जुनराव चव्हाण यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्वार मराठा महासंघाचे मार्गदर्शक रामभाऊ वाकडे यांनी काढले आहेत.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथील शिवप्रेमी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक बबनराव आवताडे, महिला जिल्हाध्यक्षा गायकवाड, अँड. प्राजक्ता शिंदे, मुरलीधर दत्तू, राजेंद्र सुरवसे, अजित जगताप, चंद्रशेखर कॉडुभैरी, सोमनाथ आवताडे, ज्ञानेवर फुगारे, सतीश दत्तू शिवाजी वाकडे, शिवाजी मोरे, शेखर इंगळे, शिवाजी जावळे, तालुकाध्यक्ष सचिन डोरले,शहराध्यक्ष आण्णा आसबे युवक शहराध्यक्ष आण्णा ओमने तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रामभाऊ वाकडे म्हणाले की, मंगळवेढा ग्रामीण भागात सर्व ठिकाणी मराठा महासंघाच्या शाखा उद्घाटन करून तरुण पिढीसाठी योगदान दिले जात आहे.
आमच्या काळात मराठा महासंघाच्या माध्यमातून दोन पतसंस्था सुरु करून मराठा समाजाला गोरगरीबांना कर्ज उपलब्ध करून दिली.आज राजमाता अर्बन बँक, लोकमंगल या बँकेच्यावतीने कर्ज उपलब्ध करुन देतअसल्यामुळे तरुणांनी उद्योग धंदे सुरू करण्यासाठी अर्जुनराव चव्हाण हे पुढाकार घेत आहेत.
यावेळी अजित जगताप, सोमनाथ आवताडे, बिस्किटे यांनीही आपल्या मनोगतातून चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच वाढदिवसानिमित्त मुकबधीर प्रशालेत मुलांना खाऊ वाटत करण्यात आला. तसेच याप्रसंगी शिवप्रेमी चौक, नागणेवाडी, बोराळे खोमनाळ नाका, धर्मगाव रोड, शिस्नादगी आदी शाखेचे उद्घाटन अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी नागणे, सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सचिन डोरले यांनी मानले.