पंढरीत शिवगर्जना अभियानास प्रचंड प्रतिसाद 

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार व्यक्त   

पंढरीत शिवगर्जना अभियानास प्रचंड प्रतिसाद 

पंढरीत शिवगर्जना अभियानास प्रचंड प्रतिसाद 

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार व्यक्त   
पंढरपूर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर शिवगर्जना अभियानास सुरुवात झाली असून राज्यात मागील काही महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडी,निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय यामुळे सर्वसामान्य जनतेत ठाकरे गटाबद्दल प्रचंड आत्मीयता निर्माण झाली आहे.सोलापूर जिल्ह्यात शिवगर्जना अभियानास गुरुवारी संत तनपुरे महाराज मठ येथे आयोजित मेळाव्याच्या माध्यमातून सुरुवात झाली असून या मेळाव्यास उपनेते विनोद घोसाळकर,उपनेते विजय कदम,शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी,माजी खासदार सुभाष वानखेडे,माजी आमदार उल्हास पाटील,युवा सेनेचे साईनाथ दुर्गे,कु.सुप्रजा फातर्पेकर, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ,युवा सेना सोलापूर संपर्क प्रमुख उत्तम आयवळे,माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,कैलास चव्हाण(सांगोला विधानसभा संपर्क प्रमुख)आदी जेष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास पंढरपूर,माळशिरस,सांगोला,माढा,करमाळा तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पप्पू तांबोळी,सचिन बंदपट्टे,राजश्री क्षीरसागर,दत्ता धोत्रे,निखिल पवार,महेश मोरे,भाजप युवा मोर्चा सचिव किरण सुतार,बजरंग कानगुडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी शिंदे गटाची संभावना मिंधे गट अशी करून ईडी आणि सीबीआय यांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करीत भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत षडयंत्र रचले.पण राज्यातील सर्वसामान्य जनतेला हे अजिबात रुचले नाही.पुढील प्रत्येक निवडणुकीत जनता याना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,यासाठी हिंदुहृय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति कुठल्याही स्वार्थाशिवाय निष्ठा बाळगत आलेले कार्यकर्ते देखील पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी जीवाचे रान करतील असा विश्वास विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केला.तर पुढील ३ दिवस शिवगर्जना अभियानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा पिंजून काढणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवीत ज्यांना शिवसेनेने मोठे केले,ज्यांना इतर कुठल्याही पक्षात संधी मिळाली नसती अशा कार्यकर्त्यांना केवळ बाळासाहेब ठाकरे या नावाने मोठेपण मिळवून दिले असे काही लोक आज आपल्या मुळावर उठले आहेत,उद्धव ठाकरे यांच्याप्रती निष्ठा वाहिलेले हजारो,लाखो शिवसैनिक आता आणखी एक लढा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि सामान्य जनतेची साथ मिळत आहे,या अभियानाच्या माध्यमातून आपण एका लढा देत आहोत आणि तो नक्कीच यशस्वी होणार असल्याचे ते म्हणाले.आणि उद्धव ठाकरे याना सीएम नाही तर पीएम करण्यासाठी आता आम्ही सज्ज झालो आहोत,देशातील अनेक पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर येत आहेत,आणि आपणही आता हेच ध्येय घेऊन संघर्ष करण्यासाठी सज्ज होऊयात असे ते म्हणाले.

या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ,माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनम अभंगराव,तालुका प्रमुख संजय घोडके,डॉ.राजश्री क्षीरसागर,शहर प्रमुख रवी मुळे,रणजित बागल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माढा जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे,काशिनाथ बासुतकर,माढा विभाग महिला आघाडी जिल्हा प्रमुख आशा टोणपे,युवासेना सहसचिव स्वप्नील वाघमारे,युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे,उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,नामदेव वाघमारे,राजाभाऊ गायकवाड,जयवंत माने,सांगोला शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब,अकलूज शहर प्रमुख अनिल बंदपट्टे,तालुका प्रमुख महिला आघाडी संगीता पवार,शहर प्रमुख पूर्वा पांढरे,उपतालुका प्रमुख प्रवीण शिंदे,युवासेना उपजिल्हा प्रमुख आकाश माने,युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण,शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर,उपतालुका प्रमुख विलास चव्हाण,माउली मासाळ,संतोष धोत्रे,कल्याण कवडे,उत्तम कराळे,बाळासाहेब पवार,उमेश काळे,शिवाजी जाधव,सोमनाथ आनपट,शहर उपप्रमुख नाना सावंतराव,विनय वनारे,अविनाश वाळके,तानाजी मोरे,माउली अष्टेकर,संघटक दत्ता यादव,बंडू घोडके,समाधान जगदाळे यांच्यासह विविध आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील गावडे यांनी केले.