रविंद्र पवार सर आणि विकास घागरे सर "ज्ञानियात्री" पुरस्काराने सन्मानित
रविंद्र पवार सर आणि विकास घागरे सर ज्ञानियात्री पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी सारख्या शिक्षणाचा गंध नसलेल्या आणि संपूर्ण गाव फक्त कष्ट आणि कष्ट करण्यात काळी आईची सेवा करुन उदरनिर्वाह करणारे हे गाव या गावातील शिक्षणप्रेमी श्री दर्लिग विद्या मंदीर चे अध्यक्ष एकनाथ पवार सर याच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने या विद्या मंदीर मध्ये ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक रविद्र पवार सर आणि विकास घागरे याना त्यानी आज पर्यत विद्यार्थाना केलेल्या ज्ञानदानाचे फळ.

" ज्ञानयात्री" हा पुरस्कार गोपाळपूरच्या खडकाळ माळावर बहुजनाच्या मुलासाठी उच्च अभियात्रिकी शिक्षण मिळावे ही शेतकर्याची मुले, मुली मोठी व्हावी.आणि देश उभारणीचे कार्य करावे या उद्देशानी या ठिकाणी स्वेरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.पी. रोंगे सर.यानी शिक्षण संस्था उभी केली.
या स्वेरी शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यातील तसेच आपल्या जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात ज्ञानदान करणार्या शिक्षकाना ज्ञानयात्री पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्याच्या तसेच या शिक्षकानी आजपर्यत केलेल्या कार्याचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यकर्माचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमा दरम्यान हा पुरस्कार देण्यात आला.दर्लिग विद्यामंदीर चे शिक्षक रविद्र पवार,विकास घागरे यांना पुरस्कार मिळाल्याने पंढरपूर शहर तालुक्यातून सर्वत्र शुभेच्छा तसेच कौतुक होत आहे.

हे ज्ञान यात्री पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर रवींद्र पवार सर तसेच विकास घागरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त करत असताना ते म्हणाले आजपर्यंत केलेल्या ज्ञानदानाचे फळ ज्ञान यात्री पुरस्काराने प्राप्त झाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान दादा अवताडे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमास मुख्याध्यापक सुभाष माने सर तसेच माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील, मुख्याध्यापक गुंड सर हे उपस्थित होते.