कमला एकादशीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचेवतीने भाविकांना फराळाचे वाटप
कमला एकादशीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे वतीने भाविकांना फराळ वाटप
पढरपूर - आज बुधवार दि.२७ रोजी पुरूषोत्तम मासातील कमला एकादशीचे औचित्य साधुन श्री संत तुकाराम भवन येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती संचलीत अन्नछत्र येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर संभाजीराजे यांच्यावतीने फराळाचे वाटप केले.

संभाजीराजे शिंदे यांनी अन्नछत्राकरीता लागणारे फराळाचे सर्व साहित्य देऊन भाविक वारकरी भक्तांना फराळाचे वाटप केला.

यावेळी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.श्री गहीनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद् शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी श्री मुकेश अनेचा, विभाग प्रमुख श्री विनोद पाटील व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.