मुंबई येथील स्टार्टअप महाराष्ट्र कार्यक्रमात दिलीप धोत्रे यांचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सन्मान

पंढरपूर -  राजकारणाबरोबरच उद्योग, रोजगार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत शून्यातून स्वतःचे उद्योगविश्व निर्माण करणारे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कर्तृत्वाचा विशेष सन्मान न्यूज १८ मराठीच्या वतीने नवी मुंबई येथील हॉटेल ताज विवांता येथे आयोजित स्टार्टअप महाराष्ट्र या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी न्यूज १८ मराठीचे संपादक मंदार फणसे उपस्थित होते.

धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत डी.डी इन्फ्रा, हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी, हॉटेल श्रीयश, ग्रँड ट्रॅक्टर्स, ग्रँड पेट्रोल पंप आणि मनसे अॅग्रो इंडस्ट्रीज अशा विविध उद्योगांची यशस्वी उभारणी करत राजकारणात राज ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावान म्हणून ओळख असलेले दिलीप धोत्रे यांनी अल्पावधीत उद्योग क्षेत्रात गरुड झेप घेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दिलीप धोत्रे यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीच्या वतीने मुंबई येथील आयोजित स्टार्टअप महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात दिलीप धोत्रे यांचा विशेष सत्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. उद्योग क्षेत्रात नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या सन्मानामुळे दिलीप बापू धोत्रे यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.