शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव बारावी बोर्ड परीक्षा मध्ये यशस्वी परंपरा कायम
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव बारावी बोर्ड परीक्षा मध्ये यशस्वी परंपरा कायम
पंढरपूर,गादेगांव - शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव बारावी बोर्ड परीक्षा मध्ये यशस्वी परंपरा कायम नुकत्याच लागलेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
दरवर्षीच्या तुलनेत याही वर्षी शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगावने आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

यावर्षी कला शाखा वाणिज्य शाखा 100% निकाल त्याचबरोबर विज्ञान शाखेचा 98. 50% निकाल लागला असून यामध्ये प्रदीप सिद्धेश्वर खटकाळे प्रथम क्रमांक त्याचबरोबर सिद्धी बापूराव झोळ द्वितीय क्रमांक अनुष्का राजेंद्र कांबळे तृतीय क्रमांक आदिती विद्याधर जोशी व विश्वजीत बाळासाहेब बाबर चतुर्थ क्रमांक बोर्ड परीक्षा मध्ये घवघवीत संपादन केले आहे.

प्रथम श्रेणीमध्ये 51विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी अभिनंदन केले. सर्व यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या महिन्यातील व शिक्षकांच्या कष्टाला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात. प्रकल्प संचालिका वर्षा मोरे,सहशिक्षक लीना बागल, शितल बागल ,फर्जना पटेल, प्राचार्य तनुजा यादव, उप प्राचार्य नियाज मुलाणी, पुनम पाटोळे, सोनाली मागाडे ,मोनाली गायकवाड, शाईन शेख, तेजश्री गव्हाणे ,प्रवीण यादव ,महाकू खांडेकर, वैभव माने ,आविता कांबळे, अजय मोरे, आदी शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.