अनेक रंगांची उधळण, टाळ्या,हर्षउल्हासाने अक्षर संमेलन संपन्न ; 30 कलाकारांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार 

अनेक रंगांची उधळण, टाळ्या,हर्षउल्हासाने अक्षर संमेलन संपन्न ;  30 कलाकारांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार 

अनेक रंगांची उधळण, टाळ्या,हर्षउल्हासाने अक्षर संमेलन संपन्न

30 कलाकारांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार 

पंढरपूर - अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून उधळलेल्या रंगास मिळालेली दाद, पोट्रेट रांगोळी, विविध कलाकृतींचा आविष्कार आणि सू लेखनाची जादू पहात, अनुभवत महाराष्ट्रातून आलेले कलाकार; कलारसिक पंढरपूर येथील 5व्या अक्षर संमेलनामध्ये तृप्त झाले. अक्षर संमेलनाच्या शेवटी कलाक्षेत्रामध्ये काम केलेल्या महाराष्ट्रातील 30 दिग्गज व नवोदित कलाकारांना अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे पाचवे अक्षर संमेलन मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष तथा मुख्याधिकारी गट-अ नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे शुभम गायकवाड, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ.शुभम आगवणे, स्वेरीचे विश्वस्त सुरज रोंगे, माजी न्यायाधीश ओंकार पाटील, स्वागताध्यक्ष नरेंद्र महाडिक, अक्षरमित्र संयोजक अमित भोरकडे, पत्रकार प्रतिनिधी रवी लव्हेकर, संयोजक प्रशांत वाघमारे उपस्थित होते. पारंपारिक  वेशभूषेत टाळांच्या व हरिनामाच्या गजरात संमेलनाच्या सुरुवातीला अक्षर दिंडी काढण्यात आली होती. संध्या साखी व भजनी मंडळ यामध्ये सहभागी झाले होते. स्वागताच्या रांगोळी मध्ये पुणे येथील गणेश माने यांनी रेखाटलेला मोर व मुंबई येथील मिताली सुर्वे यांनी रेखाटलेली स्वेरी कॉलेजची इमारत फारच सुंदर झाली होती.

महाराष्ट्रामध्ये अलौकिक काम करणाऱ्या दिग्गज व नवोदित कलाकारांना उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (आयपीएस), महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव संजय इंगळे, नरेंद्र बोरले पवार, ज्येष्ठ रांगोळीकार महादेव गोपाळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी अप्रतिमपणे फलक लेखन व लाईव्ह स्केच प्रात्यक्षिक राजेश पाटील नाशिक, राहुल बागुल धुळे, राहुल भामरे धुळे, प्रतीक पानसरे पुणे, राहुल भालेराव अहिल्यानगर यांनी सादर केले. फॅब्रिक कॅलिग्राफी आर्ट कापडी पिशवी टी-शर्ट वरील सुलेखन हेमंत घरत मुंबई, मोहित पवार पुणे, आकाश सरकाटे यवतमाळ, डॉ. तेजस लोखंडे मुंबई, सूर्यकांत वाघमारे जळगाव, पंकज नागपुरे जळगाव, गुरु प्रसाद शिंदे अकलूज भाव खाऊन गेले. अक्षर व गालिचा रांगोळी चे वर्कशॉप गणेश माने पुणे, राजन शिरोडकर मुंबई, मंगेश कांबळे यवतमाळ, सुमित ढोरे नागपूर, संतोष भालेकर पुणे, निशा उपाळे मुंबई, कार्तिक भवर बीड यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकातून आलेल्या कलाकारांना आधुनिकता शिकायला मिळाली.

अक्षर संमेलनाचे खास आकर्षण ठरलेली व्यक्ती चित्र पोट्रेट रांगोळी या संमेलनातील सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. पेशाने वकील असणाऱ्या शारदा अवसरे यांनी पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काढलेली जगतगुरु तुकाराम महाराजांची रांगोळी उलट बाजूने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची दिसून येत होती. नाशिक येथील कल्याणी बागुल हिने सतत अकरा तास रेखाटलेली गणेशाची मेटॅलिक रांगोळी भाव खाऊन गेली. विलास राहते मुंबई, केदार टेमकर सिंधुदुर्ग श्रावणी पाटील पालघर भरत नांद्रे कर्नाटक व अक्षय शहापूरकर पुणे त्यांच्या पोट्रेट रांगोळीतून अनोखा अनुभव कलाकारांना मिळाला.

सुलेखन प्रात्यक्षिक व चर्चांमध्ये श्रीकांत गवंडे मुंबई, हेमंत घरात मुंबई, सूर्यकांत वाघमारे जळगाव व श्रीराम मोहिते सांगली यांच्या सुलेखन प्रात्यक्षिक व चर्चेमधून फार काही शिकायला मिळाले. कलेचा प्रवास लोकल ते ग्लोबल या चर्चासत्रामध्ये डॉ. तेजस लोखंडे मुंबई, अक्षरमित्र  अमित भोरकडे मंगळवेढा, मंगेश कांबळे यवतमाळ, गुरुप्रसाद शिंदे अकलूज यांनी सहभाग घेऊन कलाकारांशी संवाद साधला. पुणे येथील नीरज सबनीस याचे क्यारीकॅचर व सुरेश मंदरे यांच्या अती सूक्ष्म कलाकृती संमेलनामध्ये खास आकर्षक ठरले*. सूत्रसंचलन मुख्य संयोजक प्रशांत वाघमारे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वेरीचे इन्चार्ज डॉ. एम एम पवार, गरड, प्रमोद देठे,ज्ञानेश्वर विजागत, सोनल भोरकडे, विद्या वाघमारे, ऋजुता विजागत, गणेश माने, प्रतीक पानसरेआणि असंख्य कलाकारांनी परिश्रम घेतले. आभार सतीश भेंकी यांनी मानले.

संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात लेखन साहित्य, रांगोळी टूल्स यांची खरेदी विक्री झाली. या संमेलनास जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य विभागाचे सभापती चेतन केदार, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, ज्येष्ठ  छायाचित्रकार सुनील उंबरे, विविध क्षेत्रातील मान्यवर, अनेक कलाकार, कलारसिक व पत्रकार भेट देण्यास आले होते. 
          .