आषाढी वारीत पाच लाख वारकर्यांची पंढरपूर इस्काॅन मोफत सेवा करणार

आषाढी वारीत पाच लाख वारकर्यांची पंढरपूर इस्काॅन मोफत सेवा करणार

आषाढी वारीत पाच लाख वारकर्यांची पंढरपूर इस्काॅन मोफत सेवा करणार

पंढरपूर - महाराष्ट्रासह देशभरातील लाखो वारकरी, भाविक आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शना बरोबर चंद्रभागेच्या पूर्वेला असणाऱ्या श्रीकृष्णाच्या इस्कॉन मंदिराला भेट देतात. पंढरपूरमध्ये विठ्ठलभक्ती आणि कृष्णभक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.

यावर्षीही आषाढी वारी निमित्त इस्कॉन पंढरपूरतर्फे सुमारे पाच लाख वारकरी भाविकांसाठी पूर्णपणे मोफत, स्वच्छ, पौष्टिक आणि हायजेनिक महाप्रसाद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महाप्रसादाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आषाढी वारीसाठी दरवर्षी वीस लाखांहून अधिक वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याने भाविकांच्या८ सोयीसाठी इस्कॉन मंदिराने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

चंद्रभागा नदीच्या पूर्व तीरावर वारकऱ्यांसाठी सुरक्षित स्नान व्यवस्था करण्यात आली असून, महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम उभारण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही जीवितहानी अथवा गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय, वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा आणि हॉस्पिटल सुविधा २४ तास उपलब्ध राहणार आहेत. अनुभवी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक सतत सेवेत कार्यरत राहून भाविकांना आरोग्य सेवा पुरविणार आहेत.

चौकट -

इस्कॉनच्या वतीने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांची सेवा म्हणून अन्नदान, वैद्यकीय सेवा, मुक्कामाची व्यवस्था तसेच चंद्रभागा नदीच्या पूर्व तीरावर वारकऱ्यांसाठी सुरक्षित स्नान व्यवस्था करण्यात आली असून, महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम उभारण्यात आल्या आहेत. यावर्षी पाच लाख वारकऱ्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन इस्कॉनने केले आहे.

                          - प्रल्हाद दास, इस्कॉन अध्यक्ष पंढरपूर.