मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा दहा हजारापर्यंत नेत्र शस्त्रक्रिया - प्रणव परिचारक.
मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा दहा हजारापर्यंत नेत्र शस्त्रक्रिया - प्रणव परिचारक.
पंढरपूर - कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांनी दिलेल्या सेवेच्या संस्कारातून लोकांचे आरोग्य चांगले राहावे. आणि पंढरपूर तालुका हा मोतीबिंदू मुक्त व्हावा. या संकल्पनेतून यंदाच्या वर्षी दहा हजार नागरिक हे मोतीबिंदू मुक्त होणार आहेत. अशी माहिती पांडुरंग परिवाराचे युवानेते प्रणव परिचारक यांनी दिली आहे.

कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करकंब ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मोतीबिंदू तपासणी , व लेन्स सह शस्त्रक्रिया शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यामध्ये करकंब , कासेगाव , रोपळे , तुंगत , पुलुज , खर्डी , रांजणी, गादेगाव , उंबरे पागे आणि भाळवणी अशा ठिकाणी ही शिबिरे संपन्न झाली. या शिबिरामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक , आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावत पंढरपूर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या अभियानात सहभाग घेतला.
पुणे येथील एचव्ही देसाई रुग्णालय, अंतर्गत शंकरराव साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये पंढरपूर तालुक्यात या शिबिरांमधून 4 हजार 390 रुग्णांची तपासणी झाली आहे. तर यामध्ये सुमारे 2100 च्या आसपास रुग्ण मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी पात्र झाले आहेत. या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. आज पर्यंत गेल्या सहा वर्षात प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून घेतलेल्या शिबिरांमध्ये तबल 8 हजार 900 रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये यंदाच्या वर्षीचा आकडा धरून 10 हजार नागरिक हे मोतीबिंदू मुक्त पंढरपूर तालुक्यातील होणार आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बिना टाक्याचे लेझर वरील थेट लेन्स सहित असणारी शस्त्रक्रिया नागरिकांना मोफत करून दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाला त्याच्या गावातून सोलापूर आणि पुणे येथील रुग्णालयात नेऊन ही शस्त्रक्रिया करून दिली जाईल. यासाठी चे सर्व नियोजन प्रणव परिचारक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. पुढील दीड ते दोन महिन्यात शिबिरांमध्ये झालेल्या सुमारे 2100 रुग्णांची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमातून आरोग्याच्या दृष्टीने एक वेगळे पाऊल पडलेले दिसून येत आहे.