राज्यांतील कीर्तनकारांसाठी शिंदे शिवसेनेची अपघाती विमा योजना - अक्षय महाराज भोसले
राज्यांतील कीर्तनकारांसाठी शिंदे शिवसेनेची अपघाती विमा योजना - अक्षय महाराज भोसले
पंढरपूर - शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यातील कीर्तनकारांसाठी पाच लाख रुपयांची अपघाती विमा योजना सुरु करीत असल्याची माहिती धर्मवीर अध्यात्मिक शिवसेना प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी दिली.

शिवसेनेचे नेते खा श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय , अध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य याविषयी जनजागरण करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे " धर्मवीर " नावाचे मुखपत्र सुरू करणार असल्याचे सांगून अक्षय महाराज भोसले म्हणाले , राज्यातील सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांना अध्यात्मिक शिक्षण देणार , राज्यातील ६ हजार मंदिरात प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला कीर्तन सेवा , राज्यातील २४ हजार गावातील प्रत्येकी २ भजनी मंडळास भजनी साहित्य तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले.
या सर्व उपक्रमांचा शुभारंभ उद्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले .