राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांची मोर्चे बांधणी सुरु..
पैलवान माऊली आबा काळे यांचा राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांची मोर्चे बांधणी सुरु..
पैलवान माऊली आबा काळे यांनी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षात केला प्रवेश
पंढरपूर - मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार राहिलेले अनिल सावंत यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पक्ष बळकट करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम,बैठका आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी पाठपुरावा या त्रिसूत्रीचा वापर करीत आपले पक्षकार्य आणखी जोमाने सुरु ठेवल्याचे दिसून येते.यातूनच या मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश होताना दिसून येत आहेत.

आज पंढरपुरात असाच एक उल्लेखनीय पक्ष प्रवेश पाहावयास मिळाला असून सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती मल्लविद्या क्षेत्रात पंढरीतील शंभूराजे कुस्ती आखाड्याच्या माध्यमातून वस्ताद म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेले पैलवान माऊली आबा काळे यांनी आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.अनिल सावंत यांनी पक्षाचा पंचा गळ्यात घालून त्यांचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा अध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी,माजी नगरसेवक अक्षय गंगेकर,कॉग्रेसचे शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी, संतोष रणदिवे,जमीर इनामदार, कॉग्रेसचे युवक शहर अध्यक्ष संदीप शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे वस्ताद माउली काळे यांच्या या पक्षप्रेवावेळी शकेडोच्या संख्येने पैलवान मंडळी देखील उपस्थित असल्याचे दिसून आले.
यावेळी बोलताना अनिल सावंत आणि माऊली काळे यांचे पक्षात स्वागत करून भविष्यात योग्य पदावर संधी दिली जाईल अशी ग्वाही दिली.