माघ यात्रा - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
माघ यात्रा - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
पंढरपूर :- माघ शुद्ध जया एकादशी निमित्त मुख्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

यासाठी पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, अष्टर, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, हिरवा पाला, सूर्य फुल, कलकत्ता शेवंती जिप्सी, कामिनी इत्यादी सुमारे दिड टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.श्रींचा गाभारा, सोळखांबी श्री संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे.

सदरची सजावट पुणे येथील भाविक सचिन आण्णा चव्हाण, संदिप विठ्ठल पोकळे व युवराज विठ्ठल सोनार या भाविकांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.