पंढरीत जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

डॉ. शितल शहा यांची पत्रकार परिषदेत माहिती

पंढरीत जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

पंढरीत जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

डॉ. शितल शहा यांची पत्रकार परिषदेत माहिती

पंढरपूर - पंढरपूर शहरामध्ये गेली ४० वर्षाहून अधिक काळ बाल रुग्णांची सेवा करणारे व बाल रुग्णांना जीवदान देणारे डॉ. शीतल शहा यांनी एक निष्णात बालरोग तज्ञ म्हणून नावलौकिक नांव मिळवलेला आहे. अनेक बाल रुग्णांना स्वःखर्चाने उपचार करुन जीवदान दिले आहे.या सामाजिक सेवेबरोबरच डॉक्टरांचे धार्मिक कार्यात सुध्दा मोठे योगदान आहे. ते नेहमीच तन, मन, धनाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करीत आहेत. त्यांनी पंढरपूर, बार्शी हायवेवर आढीव येथून २ कि.मी. अंतरावरतील आपल्या तपोवन या फार्महाऊसवर भव्य व दिव्य अशा अजोड कलाकृतीने व आकर्षक अशी मंदिराची निर्मिती केली आहे.

मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे बांधकामात कोणत्याही प्रकारचा लोखंडी व लाकडी वस्तूंचा वापर न करता केवळ राजस्थानी मखराना मार्बलमध्ये ४० बाय ८० लांबी-रुंदीच्या मंदिराची निर्मिती केली आहे. सदर मंदिराचे बांधकाम अल्पावधीत म्हणजे ९ महिन्यात पूर्ण करुन घेतले आहे. भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ तीर्थकरांची स्थापना मंदिरामध्ये करण्यासाठी दि. १ ते ५ फेब्रुवारीअखेर पंचकल्याणक प्रतिष्ठेचे आयोजन केले आहे.

जैन धर्म शास्त्रानुसार जैन गुरुंच्या सानिध्यातच व मंत्रोपचाराव्दारे स्थापना करावी असे असल्याने या पंचकल्याणप्रतिष्ठेसाठी जैन धर्मियांचे महान गुरु प.पू.आचार्य वर्याशिरोमणी व अध्यात्म योगी १०८ विशुध्द सागर महाराज ३० साधूसह मध्य प्रदेशाहून चालत येत आहेत. तसेच याच परिसरामध्ये मंगल विहार करणारे प.पू. आचार्य सुयोग सागर ससंघ सदर कार्यक्रमासाठी उपस्थित रहात आहे. ही एक ४० साधूची आगमनाची पर्वणी पंढरपूरवासियांना प्राप्त होत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.शीतल शहा व यांच्या पत्नी सुषमा शहा यांनी केले आहे.