मातोश्री स्व. गंगुबाई शिंदे अन्नछत्राबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून कौतुक

उद्योजक राजू खरे यांचे आषाढी वारीत होणार मोफत अन्नदान

मातोश्री स्व. गंगुबाई शिंदे अन्नछत्राबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून कौतुक

मातोश्री स्व. गंगुबाई शिंदे अन्नछत्राबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून कौतुक

उद्योजक राजू खरे यांचे आषाढी वारीत होणार मोफत अन्नदान

पंढरपूर - राज्याचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिदे यांचे स्मरणार्थ आषाढी वारीतील भाविकांना मोफत अन्नछत्र खुले केले आहे. या अन्नछत्राचे जवळच दस्तूरखुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री यांनी कौतुक केले.

उद्योजक राजू खरे हे स्वखर्चातून हे अन्नदान
ठेवले आहे.मोहोळ विधानसभा मतदार संघांचे उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या मातोश्रीच्या नावाने अन्नदान सुरु ठेवले आहे.खरे यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेकांना मदत करण्याचा त्यांचा नेहमीचाच पायंडा आहे. यामुळे पांढरीत वारीसाठी आलेल्या लोकांना मोफत भोजन देण्यासाठी या वारीत सुरुवात केली आहे

गोपाळपूर पासून जवळ असलेल्या दर्शन रांगेलगत हे अन्नदान होणार आहे.गोपाळपूर येथील जनाबाईचे दर्शन घेऊन ये जा करणाऱ्या भाविकांना या अन्नछत्राचा लाभ घेता येणार आहे.यासाठी मागील दोन दिवसापासून राजू खरे यांचे अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे हे आषाढी वारी नियोजन पाहण्याचा दौरा रविवारी होता. या दौऱयादरम्यान मुख्यमंत्री यांनी राजू खरे यांनी उघडलेल्या या अन्नछत्रचे जवळपास आले होते. यावेळी राजू खरे यांनी मुख्यमंत्री शिदे यांचे स्वागत केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, सकल मराठा समाजाचे महेश डोंगरे, दिपक वाडदेकर, माजी सरपंच विलास मस्के, पांडुरंगचे संचालक दिलीप गुरव,अरुण बनसोडे, रामहिगणीचे संभाजी लेंगरे, समाधान बाबर यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.