आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला मंत्री महोदयांचा प्रतिसाद; १० नोव्हेंबरला शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश

नीरा उजवा कालव्याच्या पाणी नियोजन बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला मंत्री महोदयांचा प्रतिसाद; १० नोव्हेंबरला शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला मंत्री महोदयांचा प्रतिसाद; १० नोव्हेंबरला शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश

नीरा उजवा कालव्याच्या पाणी नियोजन बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; सोनके व चिंचोली तलाव भरून देण्याची मागणी

सांगोला : भयाण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख सातत्याने प्रयत्नशील आहेत. रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडावे, तसेच सोनके व चिंचोली तलाव भरून द्यावेत, अशी मागणी त्यांनी जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मंत्रिमहोदयांनी १० नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

नीरा उजवा कालव्याच्या पाणी नियोजनासंदर्भात जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी खरीप हंगामातील ढिसाळ पाणी नियोजनावरून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुष्काळी सांगोला तालुक्यात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून, पाणी नियोजनातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सांगोला तालुक्यात यंदा भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना शेती टिकविण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी वेळेत आणि पूर्ण आवर्तन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली. त्याचबरोबर सोनके व चिंचोली तलाव भरून देण्याची मागणीही त्यांनी बैठकीत ठामपणे मांडली.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पाण्याविना अडचणीत राहावे लागू नये, यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी १० नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचे निर्देश दिले. त्यामुळे रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

त्याचबरोबर सोनके व चिंचोली तलाव भरून देण्याच्या आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीमुळे या तलावांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान, सोनके तलाव व चिंचोली तलावामध्ये शेतीसाठी पुढील पाणी आवर्तन १० नोव्हेंबर रोजी देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 
दुष्काळी भागातील शेतीला पाण्याचा आधार मिळावा आणि उपलब्ध पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी या मागण्यांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, सिंचनाचे प्रश्न मार्गी लागावेत आणि दुष्काळी परिस्थितीत त्यांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख सातत्याने शासनदरबारी आवाज उठवत आहेत. पाणी नियोजनातील त्रुटी, पूर्ण आवर्तनाची आवश्यकता आणि तलावांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासारख्या प्रश्नांवर ते संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहेत. नीरा उजवा कालव्याच्या नियोजन बैठकीतही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

दरम्यान, पाणी वितरण करताना कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. नियोजनानुसार शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

भयाण दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडण्याच्या आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला नामदार विखे पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तनाच्या मागणीमुळे शेतकऱ्यांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले असून, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याचे कौतुक होत आहे.


चौकट -

टेंभू-म्हैसाळ योजनेचे आवर्तन १५ डिसेंबर पर्यंत सोडणार!

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीची दखल घेत जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभू-म्हैसाळ योजनेचे आवर्तन १५ डिसेंबर पर्यंत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. नीरा उजवा कालव्याच्या पाण्याबरोबरच टेंभू-म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठीही आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.