“संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही; मैदानात उतरलोय, आता मंगेश चिवटेंच्या पाठीशी पूर्ण ताकदीने!” — मंत्री भरतशेठ गोगावले
“जो काम करतोय, जो गरजूंच्या उपयोगी पडतोय, त्याच्यासाठी आम्ही मागतोय”
“संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही; मैदानात उतरलोय, आता मंगेश चिवटेंच्या पाठीशी पूर्ण ताकदीने!” — भरतशेठ गोगावले
“जो काम करतोय, जो गरजूंच्या उपयोगी पडतोय, त्याच्यासाठी आम्ही मागतोय”
पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राज्यस्तरीय भव्य शिक्षक मेळाव्यात राज्याचे रोहयो मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शिक्षकांना संबोधित करताना भरतशेठ गोगावले म्हणाले, “संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. आम्हाला आत्तापर्यंत जे काही मिळाले आहे, ते सर्व संघर्षातूनच मिळाले आहे. म्हणूनच आम्ही सर्व मंडळी आज तुमच्या पाठीशी आहोत. काळजी करण्याचे काही कारण नाही.”

“मैदानात तर आपण उतरलेलो आहोत. आपल्या नेत्यांनी जो काही आदेश दिलेला आहे, त्या आदेशाप्रमाणे आपण वाटचाल करणार आहोत,” असे स्पष्ट करत त्यांनी शिक्षकांना आगामी लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
मंगेश चिवटे यांच्या कार्याचा उल्लेख करताना भरतशेठ गोगावले म्हणाले, “आम्ही कोणासाठी मागतोय? जो काम करतोय त्याच्यासाठी मागतोय. जो गरजू लोकांना उपयोगी पडणारा आहे, त्याच्यासाठी आम्ही मागतोय.”
यावेळी त्यांनी मंगेश चिवटे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करताना जोरदार शब्दांत सांगितले, “एसीमध्ये बसून फोन करणारा आम्हाला नाही पाहिजे; तर रस्त्यावर उतरून काम करणारा मंगेश चिवटे आम्हाला पाहिजे!”
मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या या भूमिकेला उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आणि प्रत्यक्ष जनतेमध्ये राहून काम करणारा उमेदवार या भूमिकेतून त्यांनी मंगेश चिवटे यांच्या कार्याचा उल्लेख केला.
दरम्यान, याच कार्यक्रमात आमदार शरद सोनवणे यांनीही “कामाचा चेहरा हा आपण निवडला पाहिजे; मंगळवारी आम्ही फॉर्म भरायला जावंच लागेल,” अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संघर्षाची तयारी, मैदानात उतरण्याचा निर्धार आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.