पंढरपुरात ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात; मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा व खाऊवाटप

पंढरपूर - प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात बुधवारी मुस्लिम बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या पुढाकाराने शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी दिलीप धोत्रे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण प्रेम, शांती, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा सण आहे. पंढरपुरात मशिदींना आकर्षक सजावट करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात लहान मुले, युवक व ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

चौकट - पुढे शोभायात्रा, मागे स्वच्छता; मुस्लिम बांधवांचा स्वच्छतेचा आदर्श शोभायात्रेनंतर मुस्लिम बांधवांनी स्वतः स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता पथकात मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी देखील सहभागी होत स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे संपूर्ण मार्ग स्वच्छ राहिला आणि सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले..