मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात भाजपचे भव्य रक्तदान शिबिर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात भाजपचे भव्य रक्तदान शिबिर
पंढरपूर - महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने 'महा रक्तदान संकल्प' उपक्रमांतर्गत पंढरपूर येथील श्री संत गाडगेबाबा धर्मशाळा, स्टेशन रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत (नाना) चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सोलापूर पूर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण,सोलापूर पश्चिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
या उपक्रमामुळे सामाजिक सेवेला चालना मिळाली असून, गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी धीरज म्हमाने, संदीप माने, बादलसिंह ठाकूर, नितीन करंडे, शिरीष कटेकर, काशिनाथ थिटे, प्राजक्ता बेणारे, अण्णा धोत्रे, आबासाहेब महाडिक, ओंकार बसवंती, अमित पाटोळे, ऋषिकेश म्हमाने यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.