पंढरपूर बिल्डर असोसिएशन चेअरमनपदी समाधान काळे
आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ
पंढरपूर बिल्डर असोसिएशन चेअरमनपदी समाधान काळे
आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ
पंढरपूर - बिल्डर असोसिएशन आॅफ इंडिया संलग्नित पंढरपूर सेंटरच्या चेअरमनपदी यशराज एंटरप्राइजेसचे प्रमुख समाधान काळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

पंढरपूर बिल्डर असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभआमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली बिल्डर असोसिएशनचे चेअरमन जगन्नाथ जाधव, सेक्रेटरी मनोज देशमुख, माजी चेअरमन दत्तात्रेय मुळे, अजय गुजर, अमित निमकर, सोलापूर सेंटरचे चेअरमन संतोष झाला. व्यासपीठावर राज्याचे कलकुटगी, युवा नेते प्रणव परिचारक, युवराज चुंबळकर,क्रेडाई पंढरपूर चे चेअरमन अशिष शहा, माजी चेअरमन आर. बी. जाधव, कांतीलाल डुबल, माजी चेअरमन धनाजी बागल आदी मान्यवर उपस्थित होते.

आ.समाधान अवताडे यांनी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन कामाची उभारणी करताना जगभरातील नवीन संशोधन जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. पदग्रहण समारंभानंतर पंढरपूर बिल्डर असोसिएशनचे चेअरमन समाधान काळे यांनी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी होणाऱ्या शाश्वत विकासासाठी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने पुढील काळात कामकाज करणार असल्याचे सांगितले. जगन्नाथ जाधव, माजी चेअरमन दत्ता मुळे यांनीही मार्गदर्शन केले.

समारंभात पंढरपूर बिल्डर असोसिएशनचे चेअरमन म्हणून समाधान काळे, उपाध्यक्ष संजय साठे, सचिव सुजित पाटोळे, सहसचिव सिताराम माने, खजिनदार रणजीत लोंढे पाटील यांची एकमताने निवड झाली. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, उद्योजक मुन्ना भोसले, विवेक साळुंखे यांनी असोसिएशनचे सभासदत्व स्वीकारले.नूतन पदाधिकारी व सभासदांचा सन्मान मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक उपाध्यक्ष संजय साठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी केले. आभार सहसचिव सिताराम माने यांनी मानले