पंढरीत उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा

पंढरीत उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा

पंढरीत उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा

पंढरपूर - पंढरपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील छञपती शिवाजी महाराज चौकात छञपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून त्यांना पुढील काळात जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी असे साकडे विठुरायाला घालण्यासाठी नामदेव पायरी येथे श्री.विठ्ठलाची महाआरती करण्यात आली. यानंतर मातोश्री वृध्दाश्रम येथे मिष्टान्न भोजन देण्यात आले.

यावेळी युवासेना राज्य सहसचिव स्वप्निलभैय्या वाघमारे,उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे, जयवंत माने,तालुकाप्रमुख बंडू घोडके,शहरप्रमुख युवराज गोमेवाडीकर,जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे,उपतालुकाप्रमुख प्रवीण शिंदे,नागेश रितुंड,संजय घोडके, अनिल जाधव, मा. शहर समन्वयक लंकेश बुराडे,उपशहरप्रमुख प्रणीत पवार,इश्वर साळूंखे,विजय जाधव, किरण सुरवसे, निखिल चव्हाण,रिक्षासेना शहरप्रमुख प्रणीत चव्हाण,मंजूळाताई दोडमिसे,विजया नागरे, रेहना आत्तार,शरिफा पठाण, एकनाथ कोरके, गणेश गुरव, अंकुश साळुंखे, उमेश साळुंखे किरण सुरवसे प्रवीण चव्हाण, आतिश कुळपे, समाधान गिड्डे, दत्तात्रय भोसले, विनायक ढोबळे, महेश मेहेर, नामदेव चव्हाण, कल्याण कदम, भास्कर गाडगे, गणेश फिरंगे, निखिल चव्हाण, बाळासाहेब देवकर आदींसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना पक्षाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेना पक्षाच्या पारंपारिक शैलीला एक नव्या आधुनिक रूपात नेत उद्धव ठाकरे यांनी पक्षामध्ये बदल घडवून आणले. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करत उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले होते.दरम्यान कोरोनाच्या कठीण काळात राज्याचे नेतृत्व केलं. सातत्याने जनतेशी संवाद साधत त्यांनी महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून चांगल्या पद्धतीने काम केल्याने ते लोकप्रिय ठरले होते. यानंतर शिवसेना पक्ष फुटल्यानंतरही त्यांची जनतेशी नाळ कायम ठेवल्याने शिवसैनिक त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याचा दिसून येतो.