नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी येथे कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांना विधायक उपक्रमातून अभिवादन.

वृक्षारोपण, हरिभजनाने श्रद्धेय नेत्यालाआदरांजली अर्पण.

नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी येथे कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांना विधायक उपक्रमातून अभिवादन.

नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी येथे कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांना विधायक उपक्रमातून अभिवादन.

वृक्षारोपण, हरिभजनाने श्रद्धेय नेत्यालाआदरांजली अर्पण.

पंढरपूर - राज्याच्या राजकारणात एक संततुत्य आणि जनमानसात अढळ स्थान असलेले नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, स्वर्गीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त आज पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्थांचा उदय व विकास झाला, हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि शेतकर्‍यांच्या जीवनात मोठा कायापालट झाला.याच लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथ वाडी आणि नारायण चिंचोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यस्मरणानिमित्त भैरवनाथ वाडी येथे सर्वप्रथम हरिभजनाचे आयोजन करण्यात आले होते. भजनाच्या पवित्र वातावरणात उपस्थितांनी आपल्या लाडक्या नेत्याला स्मरण केले. पुष्पवृष्टी व प्रतिमेचे पूजन: पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते श्रद्धेय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

सुपंत वृक्षारोपण: पर्यावरणाचा संदेश देत आणि कर्मयोगींच्या विचारांची जोपासना करत, भैरवनाथ भजनी मंडळ, अण्णा हजारे आणि तात्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते परिसरात 'सुपंत वृक्षारोपण' करण्यात आले. नारायण चिंचोली येथील वीर भगतसिंग सार्वजनिक वाचनालय येथेही स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाच्या वतीने नेत्याच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहण्यात आली. खाऊ वाटप करण्यात आले या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधत, नारायण चिंचोली येथे प्रसाद वाटप करण्यात आले. समाजोपयोगी आणि विधायक उपक्रमांतून नेत्याचे स्मरण करणे हा या मागचा मुख्य उद्देश होता.

यावेळी लक्ष्मणराव तात्या धनवडे, माजी सरपंच लक्ष्मण कोले,उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण , सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत माने,माजी चेअरमन ज्ञानेश्वर बरडे  , देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय मस्के  , माजी सरपंच पोपट पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष विजय कोळेकर, माजी सरपंच  बळवंत धनवडे , हरिभाऊ माने, बापूराव कोले, लहू दादा नलवडे, दादा सोनवर, पांडुरंग घाडगे, दादा  डुबल , अण्णा हजारे, दादा जानकर, श्रीधर कोळेकर, बापू कोळेकर, मुकुंद घाडगे, दत्ता बनसोडे, सचिन भडकवाड, दीपक गुंड, विनोद कोळेकर, शिवाजी भोसले, सचिन घाडगे, ज्ञानेश्वर वाघमोडे, पांडुरंग पांढरे, डॉ. आनंद गाजरे, डॉ. महादेव सरडे, भाऊसाहेब माने, सिद्धेश्वर सुरवसे, रमेश कोले, आप्पा महाडिक, नारायण गुंड, भास्कर भोसले, सचिन गुंडगे, अनिल देशमुख, बापू वसेकर, तुकाराम कोळी, महेश  माने, अण्णा बरडे ,  बाळू वसेकर, कल्याण डुबल , हनुमंत घाडगे, विजय सरवदे,यांच्यासह नारायण चिंचोली भैरवनाथ वाडी येथील समस्त भजनी मंडळ,भैरवनाथ वाडी नारायण चिंचोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते