मंगळवेढा २४ गांवचा पाणी प्रश्न सोडवूनच निवडणूकीला सामोरे जावू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंगळवेढा २४ गांवचा पाणी प्रश्न सोडवूनच निवडणूकीला सामोरे जावू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंगळवेढा २४ गांवचा पाणी प्रश्न सोडवूनच निवडणूकीला सामोरे जावू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर - मी पुन्हा येईन असे मी म्हणालो होतो. परंतु मी आलो नाही आता मी पुन्हा आलोय ते पांडुरंगाच्या कृपेने पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी तसेच मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी पुन्हा आलोय. असे वक्तव्य मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील अवताडे शुगर अँड बिसलरी प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगाम व शेतकरी मेळावा शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फडणवीस यांनी केले.


अवताडे शुगर अँड डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड या नंदुर येथील प्रथम गळीत हंगाम व शेतकरी मेळाव्या मध्ये उपस्थित मान्यवर महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रंजीत सिंह मोहिते पाटील खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सुभाष बापू देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रथम गळीत हंगाम व शेतकरी मेळाव्या मान्यवर उपस्थित कार्यक्रम पार पडला. या प्रथम गळीत हंगाम व शेतकरी मेळाव्या ला पंढरपूर मंगळवेढा परिसरातील असंख्य शेतकरी सभासद तसेच आमदार अवताडे यांचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणामध्ये पुढे बोलत असता म्हणाले पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाने भाजपाचा एक युवा उमेदवार आमदार म्हणून निवडून दिला. या युवा आमदार समाधान दादा अवताडे यांच्या पाठीशी आम्ही सर्व तकदीनिशी उभे राहणार आहोत. मंगळवेढा तालुक्यातील पाणी योजना साठी भरघोस निधी व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर केलेला आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने भाजपाचा एक उमेदवार निवडून देऊन आम्ही करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. मोजक्याच या तीन महिन्यांमध्ये आम्ही असंख्य विधायक कामाची सुरुवात केलेली असून या विकास कामाला व विधायक कामाला भरपूर निधी देण्याचे आम्ही ठरवले आहे. मंगळवेढा या तालुक्यातील नंदुर येथे बंद असलेला साखर कारखाना समाधान आवताडे यांनी सुरू करून या परिसरातील असंख्य शेतकरी तसेच तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम समाधान आवताडे यांनी केले आहे. या साखर कारखान्याच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांना तसेच कष्टकरी बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार आहे. असंख्य जोडधंदे हे या परिसरामध्ये सुरू होणार असून या माध्यमातून लोकांच्या खिशामध्ये पैसे येऊ लागतील. या परिसरातील लोकांचे आर्थिक परिस्थिती ही सुधारण्यासाठी या कारखान्याचे बहुमोल सहकार्य या परिसरातील जनतेला लाभणार आहे.


       

मंगळवेढा शहरातील तसेच तालुक्यातील 24 गावाचा पाणी प्रश्न हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निधी मंजूर केलेला आहे. महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. संत चोखोबा यांच्या समाधी स्थळ परिसरासाठी व त्याच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी आम्ही निधी मंजूर केलेला आहे. असे याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


   

पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंगळवेढा येथे शब्द दिला होता. या परिसरामधून भाजपचा एक आमदार द्या मी करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या परिसरातील विकास कामांना निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असा शब्द दिला होता. राजकारणामध्ये दिलेला शब्द लोक पाळतात असेच नाही, परंतु राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द हा पाळला आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावाच्या पाणी योजनेसाठी मंजूर केलेला आहे. तसेच पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे असे व्यक्तिमत्व आहे की दिलेला शब्द तंतोतंत पाळणारे फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळला. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. असे आपल्या प्रस्ताविकामध्ये भाजपाचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपले मत व्यक्त केले.