आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन
पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान दादा आवताडे यांचे 21 नोव्हेंबर 2022 रोजी वाढदिवस असल्याने यानिमित्ताने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध समाजिक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी हार तुरे आणि पुष्पगुच्छ बॅनर वगैरे खर्च न करता रक्तदान करून वाढदिवसाची भेट देण्यासाठीचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आमदार समाधान दादा आवताडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मित्र परिवारासह, पक्ष सहकारी, हितचिंतक, कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते हे विविध माध्यमातून शुभेच्छा देतात तर काहीजण भेटवस्तू, हार, तुरे, केक, होर्डिंग, बॅनर आदीच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात परंतु "संकल्प रक्तदानाचा मानव सेवेचा" हे ब्रीदवाक्य समोर ठेवून पाणीदार आमदार समाधान आवताडे यांच्यावर प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीने रक्तदानाचा संकल्प घेऊन उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान रुपी शुभेच्छा द्याव्यात व तेच आपल्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा असतील अशी प्रतिक्रिया आमदार समाधान दादा आवताडे यांनी पत्रिकेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.