पंढरपूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात २१५ उमेदवार
१८ डिसेंबर रोजी मतदान
पंढरपूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात २१५ उमेदवार
१८ डिसेंबर रोजी मतदान
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील बार्डी, तुंगत, खेडभोसे, खरातवाडी, मेंढापूर, नेमतवाड़ी, टाकळी गुरसाळे, अजीती, व्होळे, पुकूजवाडी या ११ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून ११ ग्रामपंचायतीचे ३८ प्रभाग आहेत तर ११२ सदस्य संख्या आहे. बुधवार ७ रोजी अर्जमाघारीनंतर २१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सरपंचपदासाठी २८ उमेदवार तर सदस्य पदासाठी २१५ उमेदवार उभे आहेत.

तालुक्यात निवडणूक सुरू असलेल्या ११ ग्रामपंचायती आहेत.बुधवार, ७ डिसेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती, तर याच दिवशी उमेदवाराला निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.
यासाठीचे मतदान १८ डिसेंबरला होणार असून २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
चौकट -
सुगाव खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध
पंढरपूर तालुक्यातील सुगाव खुर्द ३ प्रभाग तर सरपंचपदासहीत ८ सदस्य आहेत. तर २४४ मतदार आहेत. यामध्ये सरपंच पदासहीत सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तसेच टाकळी गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये एक सदस्य बिनविरोध झाले आहेत. अजोती येथे १ सदस्य तर व्होळे येथे १ सदस्य बिनविरोध निवडले आहेत.