पंढरीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पंढरीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पंढरपूर - राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध उपक्रम राबवले जात असून पंढरीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मा.आमदार प्रशांत परिचारक,सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

राज्याचे मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आरोग्य विभागामार्फत मोठे काम केले आहे.आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून तसेच आरोग्य योजनांच्या माध्यमातून ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले आहेत. अशा या डॉ. तानाजी सावंत यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, अशी प्रार्थना मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी केली व भरभरून शुभेच्छा दिल्या.

यावेळी भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत,मा. नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, समाजसेवक संजयबाबा ननवरे, पिंटू मांडवे, श्याम गोगाव, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या आरती बसवंती, ओंकार बसवंती यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अगदी मनमोकळ्या पद्धतीने हा उद्घाटन समारंभ पार पडला.मा.आ.प्रशांत परिचारक यांनी बॅटिंग करून, या स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रा. शिवाजीराव सावंत यांनी बॉलिंग टाकून प्रशांत परिचारक यांना साद दिली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या क्रिकेट संघास आकर्षक बक्षीस दिले जाणार असून, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, याशिवाय सलग षटकार आणि चौकार यासाठी उत्तेजनार्थ बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील अनेक संघांनी आपली नाव नोंदणी केली असून, १४ मार्चपासून येथील रेल्वे मैदानावर क्रिकेट शौकिनांना रंगतदार सामने पहावयास मिळणार आहेत.