गोपाळपूर येथे ग्रामसचिवालय इमारतीचे उद्या भूमिपूजन
मा.आ.प्रशांत परिचारक आणि उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते होणार ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन
गोपाळपूर येथे ग्रामसचिवालय इमारतीचे उद्या भूमिपूजन
मा.आ.प्रशांत परिचारक आणि उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते होणार ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन
तालुक्यातील प्रमुख नेते येणार एकाच व्यासपीठावर
पंढरपूर - शहरालगत असलेल्या गोपाळपूर येथे तब्बल १ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात येत असलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन शनिवारी (दि.२) सायंकाळी साडेपाच वाजता माजी आ.प्रशांत परिचारक आणि शिवसेना नेते तथा उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने तालुक्यातील सर्व प्रमुख नेते एका व्यासपीठावर येत आहेत.
वारकरी संप्रदायात गोपाळपूरला मोठे अध्यात्मिक महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ग्रामसचिवालयाची प्रशस्त इमारत बांधण्यासाठी राजाभाऊ खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आ.भरत गोगावले यांच्या माध्यमातून खास बाब म्हणून तब्बल एक कोटींचा निधी मंजूर करून घेतला असून प्रत्यक्ष या कामास सुरुवात होत आहे.

आ. समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या भूमिपूजन समारंभास 'विठ्ठल'चे माजी चेअरमन भगीरथ भालके, वसंतराव देशमुख, 'सहकार शिरोमणी'चे चेअरमन कल्याणराव काळे, 'स्वेरी'चे सचिव डॉ.बी. पी. रोंगे, दिनकर मोरे, बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड, उपसभापती राजू गावडे आदींसह जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
संदीप कोहिनकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निमकर, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच विलास मस्के व ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी केले आहे.
रस्त्यासाठी दीड कोटीचा निधी
राजाभाऊ खरे यांनी गोपाळपूर येथील ग्रामसचिवालय इमारतीसाठी एक कोटी रुपये तसेच पंढरपूर - मंगळवेढा रस्ता ते 'स्वेरी' कॉलेजपर्यंतच्या रस्त्यासाठी दीड कोटींचा निधी थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतला आहे.या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.