पंढरपूर कॅरीडाॅरला व्यापारी व नागरिकांचा विरोध
पंढरपूर नगर परिषदेवर व्यापारी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी काढला मोर्चा
पंढरपूर कॅरीडाॅरला व्यापारी व नागरिकांचा विरोध.
पंढरपूर नगर परिषदेवर व्यापारी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी काढला मोर्चा
पंढरपूर - पंढरपूर कॅरीडाॅरला विरोध दर्शविण्यासाठी पंढरपूर येथील मंदिर परिसरातील व्यापारी व विविध राजकीय व सामाजिक संघटनांची पदाधिकारी व पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा विठ्ठल मंदिर नामदेव पायरी येथून निघाला होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंढरपूर नगरपालिकेवर घडकला.
यावेळी पंढरपूर कॅरीडाॅर रद्द करा या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी गजानन गुरव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना देण्यात आले.

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी जो आराखडा बनवण्यात आला आहे. तो चुकीच्या पद्धतीने बनवला आहे. तो रद्द झाला पाहिजे त्यामध्ये सुधारणा करून व्यापारी आणि नागरिकांचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. यासाठीचा नवीन विकास आराखडा तयार करावा.अशी मागणी विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण कोळी,युवक नेते प्रणव परिचारक,नागेश भोसले, वीर महाराज, नानासाहेब कवठेकर, बाबा महाजन,लक्ष्मण पापरकर,किरण घाडगे, शैलेश बडवे, ऋषी उत्पात,नागेश इंगोले, श्रीकांत हरिदास ,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय घोडके, ओंकार देवडीकर, गणेश लंके, वैभव बडवे,नगरसेवक सुधीर धोत्रे,नगरसेवक विक्रम पापरकर, नगरसेवक लखन चौगुले ,नगरसेवक महादेव धोत्रे, संजय बंदपट्टे ,मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले ,मा. नगरसेवक महमद उस्ताद, धनंजय कोताळकर, आदित्य फत्तेपूरकर, सतीश शिंदे,समता परिषद नेते अनिल अभंगराव, विवेक बेणारे , जयवंत भोसले , शशिकांत पाटील, साईनाथ बडवे, मनसे उपप्रमुख गणेश पिंपळनेरकर,मंगेश मंजुळ आदी उपस्थित होते.