पंढरीत नूतन खासदार रामरावजी वडकुते यांचे जंगी स्वागत
पंढरीत नूतन खासदार रामरावजी वडकुते यांचे जंगी स्वागत
पंढरपूर - राज्यसभेचे नूतन खासदार रामरावजी वडकुते हे अचानक पंढरपूर दौऱ्यावर आले असता, त्यांचे शिवसेनेचे भाई नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या वतीने पंढरपूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

खा.वडकुते हे राज्यसभेवर निवड झाल्यापासून पंढरपूरचा दुसरा दौरा झाला आहे. खा. वडकुते यांची निवड झाल्यापासून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात जंगी स्वागत केले जात आहे. त्याच पद्धतीने खासदार वडकुते यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पंढरीतील सुपुत्र भाई नितीन काळे यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते. त्यांच्या सहवासात काळे यांनी अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे आपला माणूस म्हणून जंगी स्वागत केले आहे. काळे यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की खा रामराव वडकुते हे एक आदर्श व्यक्तिमत्व असून, त्यांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात अनेक प्रश्न मांडले होते. न्याय मिळवून दिला होता. आता त्यांची देशाच्या वरिष्ठ सभागृहात त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे .नक्कीच ही आम्हा कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब आहे. समाजातील अनेक प्रश्न अनेक व्यथा नक्कीच साहेब वरिष्ठ सभागृहात सोडविण्यासाठी प्रयत्न करतील. निवड झाल्यापासून एक दिवसही न थांबता समाजाच्या हितासाठी समाजाच्या अनेक अडचणी जाणून घेण्यासाठी संपूर्ण ते महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. त्यामुळे नक्कीच सर्वांना न्याय मिळेल असे काळे यांनी सांगितले.

खा.रामराव वडकुते यांची संसदेच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार विषयक संसदीय स्थायी समितीवर सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दलही विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने खा. वडकुते यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी डी.राज सर्वगोड,भाई नितीन काळे, प्राचार्य विजयकुमार वाघमोडे, शिवाजी घाडगे, रबदाडे मामा, काशिलिंग चौगुले, रामदास नागटिळक, संग्राम जाधव, आदम बागवान, विठ्ठल ढगे, अनिल लवटे सर, मल्हारी खरात, सुरेश नवले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.