भविष्यात मोठी संधी मिळू शकते; पक्षाच्या निर्णयाचा सन्मान ; माजी आ.प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट केली भूमिका

सोलापूर विधान परिषद निवडणूक; माजी आ.प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट केली भूमिका

भविष्यात मोठी संधी मिळू शकते; पक्षाच्या निर्णयाचा सन्मान ; माजी आ.प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट केली भूमिका

भविष्यात मोठी संधी मिळू शकते; पक्षाच्या निर्णयाचा सन्मान ; माजी आ.प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट केली भूमिका

पंढरपूर - सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुकांमध्ये असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या जागेसाठी माजी आ. प्रशांत परिचारक यांचे नावही आघाडीवर होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याबाबत कोणतीही नाराजी नसून पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याची भूमिका परिचारक यांनी स्पष्ट केली.

पत्रकारांशी संवाद साधताना परिचारक म्हणाले की, २०१४ मध्ये जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर सातत्याने विश्वास दाखवत विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये संधी दिली. पराभवाच्या प्रसंगीही पक्षाने साथ सोडली नाही. त्यामुळे आजही पक्षाच्या निर्णयाचा आदर करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषद उमेदवारीबाबत अपेक्षा असली तरी प्रत्येक वेळी इच्छेनुसार निर्णय होत नाहीत. पक्षालाही विविध राजकीय आणि संघटनात्मक बाबींचा विचार करावा लागतो. काही वेळा संयम बाळगावा लागतो आणि भविष्यात आणखी मोठी संधी मिळू शकते, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

दरम्यान, उमेदवारी न मि ळाल्याने परिचारक समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर, मंगळवेढा आणि परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते परिचारक यांच्या निवासस्थानी भेट देत आहेत. 

बावनकुळे यांचे आश्वासन - यावर प्रतिक्रिया देताना महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही कार्यकर्त्यांना परिचारक यांच्या पक्षनिष्ठेची व योगदानाची भाजप नेतृत्वाने योग्य दखल घेतली असून त्यांना भविष्यात निश्चितपणे संधी दिली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.