पंढरपुरात मिरवणुकीत सामील झालेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे बॉटल वाटप
दीपक चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम
पंढरपुरात मिरवणुकीत सामील झालेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे बॉटल वाटप
दीपक चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम
पंढरपूर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शनिवारी विविध जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक पंढरपूर शहरात काढण्यात आली होती.
उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून दीपक चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून ५१३५ बिसलेरी पाण्याच्या बॉटल अबालवृद भीमसैनिकांपर्यंत पोहचवण्याचे काम नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी निर्माण कृती समितीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केले.

या बॉटल वाटपाचा शुभारंभ आरपीआयचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब जाधव, रवींद्र शेवडे, एडवोकेट रोहित एकमल्ली यांच्या हस्ते करण्यात आले.
पंढरपूर शहर व तालुक्यात महापुरुषांच्या जयंती उत्सव निमित्त दिपक चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष असे सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबिर तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरवणुकीत सामील झालेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून 5135 बिसलेरी पाण्याच्या बॉटल पोचवण्याचे काम नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी निर्माण प्रति समितीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आले.
याप्रसंगी दिपक चंदनशिवे, रविंद्र शेवडे, महेश मोटे, योगेश जाधव, विशाल मांदळे,अमित कसबे, प्रकाश बाबर,रवि भोसले, बुधभूषण चंदनशिवे,राहूल शेवाळे, गणेश आहेरकर,अजय ढावरे,अजय ससाणे, निलेश घोडके,जयंत शेवाळे धनराज शेवाळे, पृथ्वीराज शेवाळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.