प्रोग्रेस विद्यालय येथे विधी सेवा समितीचे कायदेविषयक शिबीर संपन्न

प्रोग्रेस विद्यालय येथे विधी सेवा समितीचे कायदेविषयक शिबीर संपन्न

प्रोग्रेस विद्यालय येथे विधी सेवा समितीचे कायदेविषयक शिबीर संपन्न

पंढरपूर - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान शिबीर कार्यक्रमा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दिनांक ६ जानेवारी, २०२३ रोजी प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व ज्युनियर काॅलेज, पंढरपूर येथे मा. श्री. एम. बी. लंबे, जिल्हा न्यायाधीश, पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. श्री.एम.आर.कामत, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास बालिका दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश मा.एम.आर.कामत यांनी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींना पोक्सो कायदा, रस्ता सुरक्षा व किशोरवयीन मुला-मुलांचे अधिकार याबाबत जनजागृती करुन विद्यार्थींशी संवाद साधला.

 

सदर कार्यक्रमा दरम्यान विधीस्वयंसेवक श्री. सुनिल यारगट्टीकर यांनी मुलांना  केंद्र शासन व राज्य शासनाकडुन उपलब्ध करुन दिलेल्या सार्वजनिक उपयोगिता सेवा बद्दल माहिती सांगितली, तसेच माजी सरकारी वकील ॲड.श्री.एम.टी.मेंडिगीरी यांनी "प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्राॅम सेक्स्युअल ऑफेन्स” म्हणजे पोक्सो कायद्याविषयी मुलांना माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव ॲड. श्री.राहुल बोडके, कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. भगवान मुळे, अध्यक्ष अधिवक्ता संघ पंढरपूर,आभार श्री. एम. एम. नाईकनवरे, उपाध्यक्ष पंढरपूर अधिवक्ता संघ यांनी केले. प्रोग्रेस विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रशांत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व श्री.संतोष गायकवाड सह शिक्षक यांनी प्रमुख पाहुण्यांचे, उपस्थितांची मुलांना ओळख करुन दिली.

सदर कार्यक्रमास ॲड.श्री.महेश कसबे, विधीस्वयंसेवक श्री. सुनिल यारगट्टीकर,श्री.नंदकुमार देशपांडे, श्री. पांडुरंग अल्लापूरकर,ॲड.श्री.अंकुश वाघमारे, न्यायालयीन कर्मचारी,प्रशालेतील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.