रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके, अनिल सावंत यांचा समर्थकांसह शिवसेनेत पक्षप्रवेश
भगीरथ भालके, अनिल सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती
रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके, अनिल सावंत यांचा समर्थकांसह शिवसेनेत पक्षप्रवेश
संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भगीरथ भालके, अनिल सावंत यांनी दिली माहिती
पंढरपूर - मागील अनेक दिवसांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजता पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून युवक नेते भगीरथ भालके, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भगीरथ भालके यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की सत्ताधाऱ्यांकडून विकास कामे करण्यासाठी मोठा अडसर निर्माण केला जात होता. विकास कामांना अडथळा निर्माण होत असल्याने पंढरपूर आणि मंगळवेढा शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याचे कणखर नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सर्व समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणारा असून याच दिवशी पंढरपूर आणि मंगळवेढा शहर व तालुक्यासाठी मोठ्या निधीची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करतील असा विश्वास भालके यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत म्हणाले की केवळ आणि केवळ मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील सर्वसामान्य जनतेला सत्तेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्याय देणारे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पंढरपुरात समर्थकांसह प्रवेश करण्यात येणार आहे. पुढील काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
चौकट:
मागेल काही दिवसांपासून विचार विनिमय बैठकीच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत भालके गटाच्या सर्व प्रमुख नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पंढरपूर मंगळवेढा शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवसेनेत प्रवेश करणार असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेते मंडळी आणि नगरसेवकांमध्ये कोणताही मतभेद नसून दोन्ही तालुक्यातील भालके गटाची सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे भगीरथ भालके यांनी यावेळी सांगितले.