नगरसेवक पदासाठी प्रभाग दोन मधून अमित डोंबे व आदिती डोंबे यांचा उमेदावरी अर्ज दाखल

नगरसेवक पदासाठी प्रभाग दोन मधून अमित डोंबे व आदिती डोंबे यांचा उमेदावरी अर्ज दाखल

नगरसेवक पदासाठी प्रभाग दोन मधून युवक नेते अमित डोंबे व समाजसेविका आदितीताई डोंबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

प्रभाग क्र.दोन मधील सर्वांगीण विकासासाठी आमची उमेदवारी - युवक नेते अमित डोंबे

पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग दोन मधून नगरसेवक पदासाठी युवक नेते अमित डोंबे आणि समाजसेविका आदिती ताई डोंबे यांनी ज्येष्ठ नेते अशोक दादा डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल करण्यात आला आहे.

यावेळी अमित डोंबे यांनी प्रसार माध्यमशी बोलताना सांगितले की आमचा अर्ज दाखल झाला म्हणजे ५० टक्के विजय निश्चित आहे. आता फक्त घराघरात जाऊन लोकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आमचे आजोबा, वडिलांनी आणि आईसाहेबांनी जे समाजकार्य केलंय त्याच बळावर या वेळी डोंबे परिवार पुन्हा एकदा सेवा करण्यासाठी तयार आहे.सासू सासर्‍यांचा वारसा, पतींची प्रेरणा आणि जनतेचा विश्वास या तिन्ही गोष्टी माझ्या सोबत आहेत. त्यामुळे विजय नक्कीचं होणार असे आदिती ताई डोंबे यांनी सांगितले.

यावेळी प्रभागातून अर्ज दाखल करताच कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून आला.