दीपावली – बलीप्रतिपदा,दिवाळी पाडवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार परिधान

दीपावली – बलीप्रतिपदा,दिवाळी पाडवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार परिधान

दीपावली – बलीप्रतिपदा,दिवाळी पाडवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार परिधान

पंढरपूर - सावळें सुंदर रूप मनोहर!
दीपावली पाडवा निमित्त आज श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस हिरेजडित सुवर्ण अलंकारांनी सुशोभित करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली बलीप्रतिपदा, दिवाळी पाडवा या पवित्र दिवशी दुपारी पोशाखावेळी पारंपरिक पद्धतीने श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे प्रभारी व्यवस्थापक श्री पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

श्री विठ्ठलास आज परिधान केलेले अलंकार :
सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या, हिऱ्याची कंगन, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे, हिऱ्याचा कंबरपट्टा, मोर मंडोळी, तुळशीची माळ, अष्टपैलू मन्याची कंठी, बाजीराव कंठी, नवरत्नाचा हार, तसेच सोन्याचे पितांबर.
श्री रुक्मिणी मातेस आज परिधान केलेले अलंकार : मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, मत्स्य जोड, हातसर, शिंदे हार, नवरत्नाचा हार, चिंचपेटी, पाचूची गरसोळी, खड्याच्या पाटल्या, सूर्य, चंद्र, मद्रासी कंठा, दशावतारी हार, हार, बिंदी, बाजीराव गरसोळी, मास पट्टा, तारामंडल, तोडे, रूळ, सोन्याचा करंडा, साखळी, बाजूबंद जोड, खड्याची वेणी, सोन्याची साडी तसेच छत्र-छामर. श्री राधिका मातेस परिधान केलेले अलंकार :नक्षी टोप, हायकोळ, लक्ष्मीहार, जपेची माळ. श्री सत्यभामा मातेस परिधान केलेले अलंकार :सिद्धेश्वर टोप, जपेची माळ, पुतळ्यांची माळ, चिंचपेटी व पदक.

या पवित्र दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस मंदिरातील खास ठेवणीतील अनमोल सुवर्ण व हिरेजडित दागिने परिधान करण्यात आले आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे हे दिवाळीचे सुवर्णरूप पाहण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली असून, दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून “देवाचे सुवर्णरूप पाहून समाधान लाभले” असे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी दिली.