मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना भेट देऊन केली प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत

शासनाच्या अगोदर पोहोचली अतिवृष्टी बाधित नागरिकांना मनसेची मदत

पंढरपूर - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व घरात पाणी शिरल्याने घराची पडझड झालेल्या पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील कुटुंबांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहा हजार रुपयाची रोख स्वरूपाची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्यात आली.

राज्यभरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये डाळिंब, द्राक्ष,मका,उडीद, टोमॅटो, ऊस आदि खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांचे तसेच घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र नुकसानग्रस्त नागरिकांना सणासुदीच्या तोंडावर तातडीची मदत देणे गरजेचे असताना याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

शासनाच्या मदतीची वाट न पाहता मनसेची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहा हजार रुपयाची रोख स्वरूपाची मदत मनसेच्या वतीने देण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे,शहर संघटक गणेश पिंपळनेरकर,विभाग अध्यक्ष नागेश इंगोले,उपतालुकाध्यक्ष लखन घाडगे, तपकिरी शेटफळ येथील मनसे शाखाध्यक्ष नवनाथ पळसे,अण्णा कांबळे,आकाश बंदपट्टे चारही उपस्थित होते.