स्वेरी लाॅ काॅलेज व नवीन बहुउद्देशीय इमारत, सुसज्ज क्रिडांगण व नूतन वसतीगृहाचा पायाभरणी शुभारंभ
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार
स्वेरी लाॅ काॅलेज व नवीन बहुउद्देशीय इमारत, सुसज्ज क्रिडांगण व नूतन वसतीगृहाचा पायाभरणी शुभारंभ
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार
पंढरपूर - स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे आज स्वेरी लाॅ काॅलेज, सुसज्ज क्रिडांगणाच्या उद्घाटन समारंभ व वसतीगृहाचा पायाभरणी सोहळा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे होणार आहे.

मागील २७ वर्षांपासून अविरतपणे श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर अर्थात 'स्वेरी' या संस्थेच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाचे ज्ञानामृत अनेक पिढ्यांना देत आलो आहोत. या माध्यमातून तंत्रशिक्षणाची 'ज्ञानगंगा' ग्रामीण भागात प्रवाहित करण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत. स्वेरी, पंढरपूरच्या यशस्वी आणि गौरवशाली रौप्यमहोत्सवी वाटचालीसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या श्रेणीत असणाऱ्या विधी महाविद्यालयाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करीत आहोत.
स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर, नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाशझोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण यांचे उद्घाटन आणि मुलींचे ९ मजली नूतन वसतीगृह क्र. ४ चा पायाभरणी सोहळा दि.३१ रोजी सकाळी ठिक ८.३० वाजता आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी आमदार समाधान आवताडे,आमदार राजू खरे, माजी आमदार अॅड. शहाजी पाटील, माजी आमदार राम सातपुते,आमदार अभिजीत पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तसेच स्वागतोत्सुक प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे संस्थापक, अशोक भोसले अध्यक्ष, सुरेश राऊत उपाध्यक्ष, प्रा. डॉ. सुरज रोंगे, सचिव, सर्व विश्वस्त, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर (स्वेरी) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) गोपाळपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी केली आहे.