मंगळवारी सुवर्ण कृषी व ग्रामविकास उपक्रमाचा पंढरपूर येथे शुभारंभ
मंगळवारी सुवर्ण कृषी व ग्रामविकास उपक्रमाचा पंढरपूर येथे शुभारंभ
कार्यक्रमास पद्मभूषण विजय भटकर, खासदार मुन्ना महाडिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर - पंढरपूर येथे सुवर्ण कृषी ग्रामविकास प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मंगळवार दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता चंद्रभागा स्टँड समोर बागल हायटेक इरिगेशन सिस्टीम आणि सर्विसेस केंद्र येथे होणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, श्री.श्री सद्गुरु साखर कारखान्याचे चेअरमन शेषगिरी राव यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत कृषिरत्न पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे असणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना अल्प खर्चाचे दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध जल व्यवस्थापन याच सोबत विक्री व्यवस्थापनाचे सोय व मार्गदर्शन केले जाणार आहे.
पंढरपूर येथे येणारे लाखो वारकरी हे शेतकरी असतात म्हणून त्यांच्यापर्यंत हा कृषी व ग्रामीण विकास पोहोचवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पंढरपूर येथे सोलापूर सुवर्ण कृषी व ग्रामविकास अंतर्गत पंढरपूर सुवर्ण कृषी ग्रामविकास प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक नानासाहेब कदम यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.

स्वतंत्र तर काळात शहरीकरण व शास्त्रीय रासायनिक खते आवश्यक व विवेकी पाण्याचा वापर यामुळे निर्माण झालेले प्रश्न भारतीय समाजामध्ये ठळक दिसत आहेत. म्हणून या समस्येतून भारतीय समाजाला ग्रामीण भागाला व कृषी व्यवस्थेला मुक्त करण्यासाठी पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी गेले अकरा वर्षे संशोधन व संकलन करून शाश्वत कृषी विकास व ग्रामविकासाचे आरेखन केले आहे. या आरेखनाची उपयुक्तता कृषी प्रधान व खेड्यांचा देश असलेल्या भारत देशाला निश्चित होणार आहे. या शाश्वत कृषी व ग्रामविकासाचा कायापालट प्रोजेक्ट म्हणून पंढरपूरची निवड करण्यात आली आहे.