आषाढी वारीत २ दिवस मोफत अन्नदान  ; आ.राजू खरे यांचे अन्नदानाचा हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीत २ दिवस मोफत अन्नदान  ; आ.राजू खरे यांचे अन्नदानाचा हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीत २ दिवस मोफत अन्नदान 

आ.राजू खरे यांचे अन्नदानाचा हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ

पंढरपूर -  मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे दानशूर आमदार राजू खरे यांनी मागील वर्षीपासून आषाढी वारीमध्ये सलग दोन दिवस मोफत अन्नदान सुरू केले आहे.त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला आहे.

आ.राजू खरे यांनी सुरू केलेल्या अन्नदानाची परंपरा यावर्षीही सुरू ठेवली होती. एकादशी दिवशी फराळ आणि फळे वाटप. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बारस सोडण्यासाठी मिष्ठान्न भोजन होणार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस हे अन्नदान करण्यात आले आहे.

या वेळी अन्नदानचे आ. राजू खरे, त्यांच्या पत्नी तृप्ती खरे, मुली अवंती व अबोली यांच्यासह संजय मस्के, पंकज तोंडे, पंकज माने, अरुण बनसोडे, नोमीनाथ शिरसट, अतिश सावंत, निखिल गायकवाड, सुभाष बनसोडे, प्रवीण खरे, मोहन शिंदे, माऊली कोळी, प्रकाश माळी, सिद्धू चव्हाण, आकाश धोत्रे, राहुल जावळे आदीनी परिश्रम घेतले.